फक्त 5 हजार रुपये आणि 8वी पास, Post Office देतेय व्यवसायाची संधी

फक्त 5 हजार रुपये आणि 8वी पास, Post Office देतेय व्यवसायाची संधी

Post Office, Jobs - तुम्हाला बिझनेस करायचाय? मग पोस्ट ऑफिसची ही संधी पाहा

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : पोस्ट ऑफिसची मागणी सध्या वाढलीय. अनेक जण पूर्वी पोस्ट ऑफिसमध्ये जायला घाबरायचे. पण आता जास्त लोकांनी Post Office चा रस्ता पकडलाय. भारतात 1.55 लाख पोस्ट ऑफिसेस आहेत. पण अनेक भागात पोस्ट ऑफिसेस नाहीतच. म्हणूनच पोस्टल डिपार्टमेंट पोस्ट ऑफिस उघडण्यासाठी फ्रेंचाइजी देतंय. त्यात चांगली कमाई होतेय. जाणून घेऊ याबद्दल-

फ्रेंचाइजी घेऊन करू शकता हा बिझनेस

तुम्हाला फ्रेंचाइजी हवी असेल तर तुम्हाला फक्त 5 हजार रुपयांचं डिपाॅझिट द्यावं लागेल. फ्रेंचाइजी घेतल्यावर तुम्ही ग्राहकांना स्टँप आणि स्टेशनरी, रजिस्टर्ड आर्टिकल्स, स्पीड पोस्ट आर्टिकल्स, मनी ऑर्डरचं बुकिंग, पोस्टल लाइफ इन्शुरन्स या सगळ्या सेवा उपलब्ध करून देऊ शकता. बिल, कर , दंड भरणं याही सुविधा इथे मिळू शकतात. तुमची नियमित मिळकत सुरू होऊ शकते.

ग्रॅज्युएट्स आणि इंजिनियर्सना SAIL मध्ये नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

8वी उत्तीर्णही घेऊ शकतात फ्रेंचाइजी

पोस्ट ऑफिसची फ्रेचाइजी कमीत कमी शिक्षण असलेलेही घेऊ शकतात. 8वी उत्तीर्ण झालेल्यांपासून सुरुवात होते.

फ्रेंचाइजी कोण घेऊ शकतं? 

कोणीही व्यक्ती, इन्स्टिट्युशन्स, संस्था किंवा किराणेवाले, पानवाले, स्टेशनरी शाॅप, स्माॅल शाॅपकीपर इत्यादी पोस्ट ऑफिस फ्रेंचाइजी घेऊ शकतात. याशिवाय शहरात सुरू होणारी टाऊनशिप, स्पेशल इकाॅनाॅमिक झोन्स, इंडस्ट्रियल सेंटर, काॅलेज, पाॅलिटेक्निक्स, विद्यापीठं, व्यावसायिक काॅलेजेस इत्यादी फ्रेंचाइजीचं काम घेऊ शकतात. फ्रेंचाइजी घेण्यासाठी कमीत कमी 8वी उत्तीर्ण हवं. व्यक्तीचं वय कमीत कमी 18 वर्ष असायला हवं.निवडलेल्या व्यक्तींना डिपार्टमेंटबरोबर MoU साइन करायला हवं.

4 दिवसांनी पेट्रोल झालं महाग, 'या' आहेत आजच्या किमती

कोणाला फ्रेंचाइजी मिळू शकत नाही?

पोस्ट ऑफिसमध्ये काम करणारे कार्मचाऱ्यांच्या कुटुंबापैकी कुणी त्याच विभागात फ्रेंचाइजी घेऊ शकत नाही. पण कर्मचाऱ्याची पत्नी, सख्खी किंवा सावत्र मुलं आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती फ्रेंचाइजी घेऊ शकतात.

कशी होते निवड?

फ्रेंचाइजी घेणाऱ्याची निवड डिव्हिजनल हेड करतो. अर्ज मिळाल्यानंतर 14 दिवसांच्या आत ASP/SDIच्या रिपोर्टवर आधारित असते.

दिलं जातं ट्रेनिंग आणि अवाॅर्ड

Post Office फ्रेंचाइजी घेणाऱ्यांना खास प्रशिक्षण देतं. शिवाय चांगलं काम करणाऱ्यांना पोस्ट ऑफिस अवाॅर्डही देतं.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि दर महिन्याला घ्या फायदा

कशी होईल कमाई?

रजिस्टर्ड आर्टिकल्सच्या बुकिंगवर 3 रुपये, स्पीड पोस्ट आर्टिकल्सच्या बुकिंगवर 5 रुपय्, 100 ते 200 रुपयाच्या  मनी ऑर्डरच्या बुकिंगवर 3.50 रुपये, 200 रुपयाहून जास्त मनी ऑर्डरवर 5 रुपये, दर महिन्याला रजिस्ट्री आणि  स्पीड पोस्टच्या 1000 हून जास्त आर्टिकल्स बुकिंगवर 20 टक्के जास्त कमीशन मिळतं.तसंच पोस्टेज स्टँप, पोस्टल स्टेशनरी आणि मनी ऑर्डर फॉर्मच्या विक्रीवर  5 टक्के मिळतात.

किती असेल सिक्युरिटी डिपाॅझिट?

यासाठी तुम्हाला 5 हजार रुपये डिपाॅझिट भरावं लागेल. ते NSC फाॅर्मच्या रूपात असतं. रोजचा रिव्हेन्यू वाढला की डिपाॅझिटही वाढतं.

VIDEO: मराठा आरक्षण...आंदोलक सरकारवर नाराज; घेतला 'हा' मोठा निर्णय

Published by: Sonali Deshpande
First published: July 23, 2019, 3:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading