Home /News /money /

Post Office मधून पैसे काढणे आणि जमा करण्याच्या नियमांत बदल; आकारले जाणार शुल्क

Post Office मधून पैसे काढणे आणि जमा करण्याच्या नियमांत बदल; आकारले जाणार शुल्क

पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यासंदर्भातल्या (Post Office Savings Account) नियमांमध्ये बदल झाला आहे. डिया पोस्ट पेमेंट बँकेने (India Post Payment Bank)आता पैसे काढणं, जमा करणं आणि 'आधार'वर आधारित पेमेंट सिस्टीमवर (AEPS) शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 4 एप्रिल : पोस्ट ऑफिसच्या बचत खात्या संदर्भातल्या (Post Office Savings Account) नियमांमध्ये बदल झाला आहे. नवे नियम एक एप्रिल 2021 पासून लागू झाले आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने (India Post Payment Bank) आता पैसे काढणं, जमा करणं आणि 'आधार'वर आधारित पेमेंट सिस्टीमवर (AEPS) शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. थोडक्यात सांगायचं तर, ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार झाले, तर तुम्हाला खात्यात पैसे जमा करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क मोजावं लागणार आहे. कोणत्या खात्यांवर कोणते नियम लागू असतील, याची ही माहिती - बेसिक सेव्हिंग्ज अकाउंटवर (Basic Savings Account) किती शुल्क? तुमचं बेसिक सेव्हिंग्ज अकाउंट असेल, तर महिन्यातून चार वेळा पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही. त्यापेक्षा जास्त वेळा पैसे काढायचे असतील, तर 25 रुपये किंवा 0.5 टक्के अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल. पैसे जमा करण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही.

  फक्त एकदाच पैसे भरा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन; तुमच्यासाठी नवा टर्म इन्शुरन्स प्लॅन

  सेव्हिंग्ज आणि करंट अकाउंट्सच्या बाबतीत तुमचं सेव्हिंग्ज (Savings) किंवा करंट (Current) अकाउंट असेल, तर दर महिन्याला तुम्ही 25 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता. त्यापेक्षा जास्त पैसे काढायचे असतील, तर तुम्हाला 25 रुपये अतिरिक्त शुल्क भरावं लागेल. तसंच, 10 हजार रुपयांपर्यंतची रोख रक्कम भरण्यासाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही. त्यापेक्षा जास्त रोख रक्कम भरायची असेल, तर कमीत कमी 25 रुपये शुल्क भरावं लागेल. 'आधार'वर आधारित पेमेंट सिस्टीम IPPB नेटवर्कमध्ये अर्थात पोस्टाच्याच खात्यांमध्ये देवघेवीचे कितीही व्यवहार झाले, तरी त्यासाठी वेगळं शुल्क आकारलं जात नाही. Non-IPPB नेटवर्कमध्ये केलेल्या व्यवहारांपैकी केवळ पहिले तीन व्यवहारच मोफत असतात. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहाराला अतिरिक्त शुल्क मोजावं लागेल. मिनी स्टेटमेंट (Mini Statement), कॅश काढणं, कॅश जमा करणं या सगळ्या व्यवहारांना हा नियम लागू होतो. मर्यादेबाहेरील प्रत्येक वेळी पैसे जमा करताना 20 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. ग्राहकांना मिनी स्टेटमेंटसाठीही पाच रुपये मोजावे लागणार आहेत. मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर देवघेवीचे व्यवहार केले, तर देवघेवीच्या व्यवहारातल्या रकमेच्या एक टक्का रक्कम आपल्या खात्यातून वजा केली जाईल. ही रक्कम कमीत कमी एक रुपया किंवा जास्तीत जास्त 25 रुपये असेल. या सगळ्या प्रकारच्या अतिरिक्त शुल्कावर जीएसटी आणि सेसही आकारला जाणार आहे.
  First published:

  Tags: Post office money

  पुढील बातम्या