इंडियन ऑईलने लाँच केला हलक्या वजनाचा सिलेंडर; वाचा काय आहे वैशिष्ट्यं आणि फायदे

इंडियन ऑईलने लाँच केला हलक्या वजनाचा सिलेंडर; वाचा काय आहे वैशिष्ट्यं आणि फायदे

कंपनीनं वजनाला अतिशय हलके (Light Weight) आणि रंगीत (Colored) गॅस सिलेंडर (Gas Cylinder) दाखल केले आहेत. खास मॉड्यूलर किचनसाठी (Modular Kitchen) हे सिलेंडर डिझाईन करण्यात आले असून, इतरत्रही त्याचा वापर करता येणं शक्य आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 मे : इंडियन ऑईल कंपनीनं (Indian Oil) आपल्या ग्राहकांसाठी एक खास भेट आणली आहे. कंपनीनं वजनाला अतिशय हलके (Light Weight) आणि रंगीत (Colored) गॅस सिलेंडर (Gas Cylinder) दाखल केले आहेत. खास मॉड्यूलर किचनसाठी (Modular Kitchen) हे सिलेंडर डिझाईन करण्यात आले असून, इतरत्रही त्याचा वापर करता येणं शक्य आहे. या सिलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात गॅस किती शिल्लक आहे हे सहज दिसणार आहे.

इंडियन ऑईलनं ट्विटद्वारे या सिलेंडर विषयी माहिती दिली आहे. आपल्या मॉड्यूलर किचनला साजेसे असे हे सिलेंडर खास डिझाइन करण्यात आले असून हे नवीन प्रकारचे सिलेंडर सध्या हैदराबाद आणि दिल्लीमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या इंडेन वितरकाशी संपर्क साधावा, असं कंपनीनं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

5 आणि 10 किलोचे सिलेंडर दाखल -

फायबरपासून (Fiber) बनवलेले हे सिलेंडर सध्या 5 आणि 10 किलोच्या आकारात उपलब्ध आहेत. सध्या घराघरात लोखंडी 14.2 किलो गॅस असणारे लोखंडाचे सिलेंडर वापरले जातात. देशात प्रथमच फायबरचे सिलेंडर उपलब्ध करण्यात आले आहेत.

(वाचा - खोळंबा टाळण्यासाठी आज पूर्ण करा Banking संबंधित काम, उद्यापासून 3 दिवस बँका बंद)

काय आहेत या सिलेंडरचे फायदे -

- हे गॅस सिलेंडर वजनाला खूप हलके आणि रंगीबेरंगी असतील.

- सध्या अस्तित्वात असलेल्या गॅस सिलेंडर्सपेक्षा हे वजनाला किमान 50 टक्के हलके असतील.

- फायबरपासून बनवलेले हे सिलेंडर सुरक्षित असतील.

- फायबरपासून बनवलेल्या या सिलेंडरमध्ये जास्तीत जास्त 10 किलो गॅस असेल.

-सिलेंडरचा काही भाग पारदर्शक असेल, त्यामुळे ग्राहकांना सिलेंडरमध्ये किती गॅस उरला आहे हे सहज पाहता येईल.

(वाचा - धक्कादायक! Lockdown निर्बंधांमुळे एप्रिलमध्ये 75 लाख जणांनी नोकऱ्या गमावल्या)

गेली अनेक वर्षे वजनाला हलके आणि सुरक्षित गॅस सिलेंडर्स निर्माण करण्याबाबत संशोधन सुरू आहे. सध्या वापरात असलेली सिलेंडर्स ही लोखंडापासून बनवलेली असल्यानं ती वजनाला चांगलीच जड असतात. त्यामुळं उंच इमारतींमध्ये ती पोहोचवणं हे सिलेंडर वितरीत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खूपच त्रासदायक होतं. तसंच अनेक ठिकाणी लोक स्वतः जाऊन हे सिलेंडर्स आणत असल्यानं त्यांना वजन उचलणं खूपच कठीण होतं. महिलांनादेखील ही सिलेंडर्स उचलणं, एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणं कठीण जातं. या सगळ्या अडचणी या फायबर सिलेंडर्समुळे सोप्या होण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही फायबर सिलेंडर्स उत्तम असल्याचं सिद्ध झालं, की सध्याची लोखंडी सिलेंडर्सऐवजी फायबर सिलेंडरचा वापर करण्यालाही गती मिळेल. ग्राहक आणि कंपन्यांच्या दृष्टीनंही हे सोयीचं ठरेल.

First published: May 6, 2021, 4:13 PM IST

ताज्या बातम्या