सावधान! IOC नं केलं सावध, 'ही' चूक केलीत तर होईल लाखोंचं नुकसान

सावधान! IOC नं केलं सावध, 'ही' चूक केलीत तर होईल लाखोंचं नुकसान

Indian Oil, Jobs - इंडियन ऑइल कंपनीनं लोकांना एका गोष्टीसाठी सावध केलंय. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 18 जुलै :  नोकरीच्या खोट्या जाहिरातीपासून वाचण्यासाठी ऑइल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइलनं सावधानतेचा इशारा दिलाय. इंडियन ऑइल कंपनीनं ट्वीट करून सांगितलंय की काही लोक, संस्था इंडियन ऑइलच्या नावानं खोट्या नोकऱ्यांची ऑफर देतायत. जनतेनं त्यावर विश्वास ठेवू नये. इंडियन ऑइलनं सांगितलंय की, खोट्या संस्था, लोक कंपनीच्या नावानं खोट्या नोकऱ्या देण्याचा दावा करतायत. लोकांकडून पैसे उकळतायत. त्यासाठी ते फ्राॅड ई मेल, सोशल मीडिया मेसेजेसचा वापर करतायत.

इथे असतील नोकरीच्या खऱ्या जाहिराती

कंपनीनं सांगितलंय की, इंडियन ऑइलच्या सर्व व्हेकन्सीच्या जाहिराती मुख्य वर्तमानपत्र, एम्प्लाॅयमेंट न्यूज, रोजगार समाचार यात येतात. यात शैक्षणिक योग्यता, वय, अनुभव आरक्षित व्यक्तींसाठी वयाची सवलत हे सर्व डिटेल्स असतात. निवड कशी केली जाईल, याचाही उल्लेख असतो.

5 महिन्यात सर्वात महाग झालं पेट्रोल, 'हे' आहेत नवे दर

याशिवाय व्हेकन्सीचे डिटेल्स इंडियन ऑइलच्या अधिकृत बेवसाइटवर www.iocl.com असतात. एक्झिक्युटिव्ह किंवा नाॅन एक्झिक्युटिव्ह पदासाठी इंडियन ऑइल आउटसोर्स करत नाही.

भारतीय लष्करात लाॅ ऑफिसरसाठी भरती, 'अशी' होईल निवड

कंपनी अर्ज फीशिवाय काही घेत नाही

कंपनीनं निक्षून सांगितलंय की ती फक्त अर्ज फी घेते. त्याचा उल्लेख जाहिरातीत असतो. त्याव्यतिरिक्त कंपनी पैसे घेत नाही. खोटी जाहिरात देणाऱ्या एजन्सीज मात्र कंपनीच्या नावाखाली बरेच पैसे उकळतात. म्हणूनच कंपनीनं लोकांना सावध केलंय.

सशस्त्र सीमा दलात 150 जागांवर व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

फसवणूक करणाऱ्या लोकांना पैसे दिले तर कंपनी जबाबदार नाही

लोकांकडून नोकरीच्या खोट्या जाहिराती करून पैसे उकळले तर त्याला इंडियन ऑइल जबाबदार राहणार नाही, असं कंपनीनं सांगितलंय. म्हणूनच नोकरी, करियर याबद्दल इंडियन ऑइलच्या www.iocl.com या वेबसाइटवरच अवलंबून राहावं, असं कंपनी म्हणते.

देवदूत मोटरमन; ...अन्यथा 500 फूट खोल दरीत कोसळली असती एक्स्प्रेस

First published: July 18, 2019, 12:57 PM IST
Tags: indian oil

ताज्या बातम्या