मराठी बातम्या /बातम्या /मनी /ही ट्रेन आहे की, फाइव्ह स्टार हॉटेल? सुविधा पाहून प्रवासी होतील चकीत

ही ट्रेन आहे की, फाइव्ह स्टार हॉटेल? सुविधा पाहून प्रवासी होतील चकीत

भारत गौरव ट्रेनमधील सुविधा

भारत गौरव ट्रेनमधील सुविधा

ही ट्रेन एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही. बाहेरून पाहून प्रत्येक जण या ट्रेनचं कौतुक करतय. मग या ट्रेनच्या आत किती सुविधा असतील बरं. या ट्रेन समोर अगदी फ्लाइटही फिकी पडेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 23 मार्च: भारतीय रेल्वेत दिल्या जाणाऱ्या सुविधा सध्याच्या काळात तेजीने विस्तार करत आहेत. वंदे भारत, बुलेट ट्रेनपासून तेर अशा अनेक ट्रेन आहेत ज्यामध्ये प्रवास करण्याची वेगळीच मजा आहे. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी भारताची पहिली प्रायव्हेट ट्रेन सुरु करण्यात आली आहे. ही ट्रेन लोकांना खूप आवडतेय. भारत गौरव स्किम अंतर्गत ही ट्रेन सुरु करण्यात आलीये. सरकारने घरगुती पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’आणि ‘देखो अपना देश’ हा उपक्रम सुरु केला होता. या उपक्रमाअंतर्गत रेल्वे मंत्रालयाच्या आदेशावर भारत गौरव टूरिस्ट ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत.

या मालिकेत सोमवारी भारतीय रेल्वेने भारत गौरव डिलक्स टुरिस्ट ट्रेन सुरू केली. जी नवी दिल्लीहून नॉर्थ ईस्ट सर्किट पूर्ण करण्यासाठी निघाली. रेल्वे मंत्रालयाने या आलिशान ट्रेनमधील एक व्हिडिओ देखील शेअर केलाय. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ खूप पसंत पडतोय. ही ट्रेन एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही. बाहेरून पाहून सगळेच या ट्रेनचे कौतुक करत आहेत. यामुळे आतुनही ही ट्रेन जबदरस्त असणारच आहे. या फ्लाइटसमोर फ्लाइटही फिकी वाटतेय.

ट्रेनमध्ये 'या' लोकांना मिळू शकते भाड्यामध्ये सूट, जाणून घ्या काय आहेत रेल्वेचे नियम?

15 दिवसांचे टूर पॅकेज

ही ट्रेन 21 मार्चपासून दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून सुरू होतेय. या 15 दिवसांच्या प्रवासादरम्यान, पूर्वोत्तर राज्यांना जवळून जाणून घेण्यासाठी एक खास टूर पॅकेज तयार करण्यात आलेय. 15 दिवसांच्या प्रवासात ही ट्रेन आसाममधील गुवाहाटी, शिवसागर, फरकाटिंग आणि काझीरंगा, त्रिपुरामधील उनाकोटी, आगरतळा आणि उदयपूर, नागालँडमधील दिमापूर आणि कोहिमा आणि मेघालयातील शिलाँग आणि चेरापुंजी येथून सफर करेल. या ट्रेनमध्ये दिल्ली, गाझियाबाद, अलीगढ, तुंडला, इटावा, कानपूर, लखनऊ आणि वाराणसी येथून या ट्रेनमध्ये बोर्डिंग आणि डी-बोर्डिंगला परवानगी असेल.

भाडं किती असणार

AC-2 टियरमध्ये प्रति व्यक्ती 1,06,990 रुपये, AC-1 केबिनमध्ये प्रति व्यक्ती1,31,990 रुपये आणि AC-1 कूप मध्ये प्रति व्यक्ती 1,49,290 रुपयांपासून याची सुरुवात होईल. तिकिटामध्ये ट्रेन प्रवास, हॉटेलमध्ये थांबण्याचे चार्ज, सर्व शाकाहारी भोजन, संबंधित शहरांमधील प्रेक्षणीय स्थळांची यात्रा आणि विमा चार्जही जोडण्यात आलेय.

ट्रेनमध्ये दोन उत्तम जेवणाचे रेस्टॉरंट आणि एक किचन

'नॉर्थ-ईस्ट डिस्कव्हरी' #BharatGaurav डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन मिनी लायब्ररी, फाइन डायनिंग रेस्टॉरंट यासारख्या अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे प्रवाशांना एक संस्मरणीय प्रवास अनुभवता येईल. ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, इलेक्ट्रॉनिक सेफ्स आणि प्रत्येक कोचसाठी तैनात समर्पित सुरक्षा कर्मचारी यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये वाढवली आहेत. प्रवास आणि बुकिंगबद्दल अधिक माहितीसाठी, पर्यटक IRCTC वेबसाइट https://www.irctctourism.com ला भेट देऊ शकतात. वेब पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ऑनलाइन बुकिंग उपलब्ध आहे.

First published:
top videos

    Tags: Indian railway, IRCTC, Train