आर्थिक आघाडीवर मोदी सरकारला दोन मोठे धक्के, उत्पादन दर पुन्हा घसरला

आर्थिक आघाडीवर मोदी सरकारला दोन मोठे धक्के, उत्पादन दर पुन्हा घसरला

उत्पादन वाढीचा दर हा विकासाच्या प्रक्रियेत महत्त्वाचा असतो. त्यावरूनच अनेक गोष्टींचे अंदाज या जगभरातल्या संस्था बांधत असतात. हा दर असाच राहिला तर भारताचं पतमानांकन घसरण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

  • Share this:

नवी दिल्ली 12 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा विधेयकावर केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला मोठा विजय मिळालाय. मात्र त्याचा आनंद ताजा असतानाच आर्थिक आघाडीवर मात्र सरकारला दोन मोठे धक्के बसले. गेल्या वर्षभरापासून भारताची अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे विकासदरात मोठी घट झालीय. तर उत्पादनचा दरही घसरलाय. गेल्या पाच वर्षातला त्याने तळ गाठला आहे. महागाई गेल्या काही वर्षांपासून नियंत्रणात होती मात्र तिनेही डोकं वर काढल्याने सरकारची चिंता वाढली आहे. सरकारनं अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या मात्र त्याचा परिणाम अजुनही दिसून आलेला नाही. जागतिक मंदी, गुंतवणूकदारांमध्ये असलेला निरुत्साह यामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात महागाई दर वाढून तो (India Inflation) 4.62 वरून 5.54 टक्क्यांवर गेलाय. ऑक्टोंबरमध्ये इंडस्ट्रियल ग्रोथ (Index of Industrial Production) पुन्हा घसरला आहे.

हा दर -5.4 टक्क्यांवरून -3.8 टक्क्यांवर गेलाय. 2018 मध्ये हा दर 8.4 टक्के एवढा होता. उत्पादन वाढीचा दर हा विकासाच्या प्रक्रियेत महत्त्वाचा असतो. त्यावरूनच अनेक गोष्टींचे अंदाज या जगभरातल्या संस्था बांधत असतात. हा दर असाच राहिला तर भारताचं पतमानांकन घसरण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

मोदी सरकार वाढवणार GST चे दर, या वस्तू होणार महाग

15 डिसेंबरपासून बदलणार बँकेचे नियम

तुमचं बँकेत बचत खात असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 15 डिसेंबरनंतर बचत खातं आणि एटीए सेवेसाठी बँकेकडून जादा पैसे आकारले जाणार आहे. तुमचं जर ICICI बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. 15 डिसेंबरपासून आयसीआयसीआय बँक बचत खात्याच्या काही नियमांमध्ये बदल करणार आहे. तुम्हाला जर हे बदलेले नियम माहीत नसतील तर तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

नोकरी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी, आता तुमच्या हातात येऊ शकतो जास्त पगार

आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार बचत खात्यात पैसे भरणं, आणि पैसे काढण्यासाठी आतापर्यंत कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. एटीएममधून केल्या जाणाऱ्या ट्रान्झाक्शनवरही किरकोळ दंड आकारण्यात येत होता. मात्र आता बँकेचे नियम बदलण्यात आले असून चार्ज लावण्यात येणार आहे. त्यामुळे बदलेल्या नियमांची माहिती नसल्यास तुम्हाला भुर्दंड भरावा लागू शकतो.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2019 07:11 PM IST

ताज्या बातम्या