Home /News /money /

पेन्शनर्सच्या कुटुंबीयांना सरकारचा दिलासा! निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर पेन्शन मिळवण्यास येणार नाही समस्या

पेन्शनर्सच्या कुटुंबीयांना सरकारचा दिलासा! निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर पेन्शन मिळवण्यास येणार नाही समस्या

पेन्शन वाटप करणाऱ्या बँकांना सरकारने आदेश जारी केले आहेत, आता काही ठराविक दस्तावेज जमा करून पेन्शनधारकाचे कुटुंबीय अगदी सोप्या पद्धतीने पेन्शनची रक्कम मिळवू शकतात.

    नवी दिल्ली, 26 जून: भविष्यासाठी पेन्शन फंड (Pension Fund) जमा करण्यासाठी अनेक कर्मचारी झटत असतात. मात्र काही वेळा अशा कर्मचाऱ्यांच्या अकस्मात मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना पेन्शनची ही रक्कम मिळणं अनेकदा समस्येचं काम होतं. सरकारने पेन्शनर्सना सामोरं जावं लागणाऱ्या अडचणी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून हे नियम सोपे केले गेले आहेत. पेन्शन वाटप करणाऱ्या बँकांना सरकारने याबाबत आदेश जारी केले आहेत, आता काही ठराविक दस्तावेज जमा करून पेन्शनधारकाचे कुटुंबीय अगदी सोप्या पद्धतीने पेन्शनची रक्कम मिळवू शकतात. फॅमिली पेन्शन (Family Pension) मिळवण्यासाठी कुटुंबातील सदस्य, पती/पत्नी यांना विविध कागदपत्रांसह मोठी फॉर्मेलिटीज पूर्ण करावी लागत असे. आता कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयांतर्गत निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन कल्याण विभागाने बँकांना लवकरात लवकर परिस्थिती सुधारण्यास सांगितले आहे. हे वाचा-SBI Alert! 5 दिवसांनी बदलणार नियम, ATM मधून पैसे काढण्यासाठी किती शुल्क? पती-पत्नी किंवा ज्या कुटुंबातील सदस्याचं नाव मृत पेन्शनधारकाला जारी करण्यात आलेल्या पीपीओमध्ये आहे त्यांना काही ठराविक दस्तावेज द्यावे लागतील. जॉइंट अकाउंट असल्यास पेन्शन मिळवण्यासाठीचा अर्ज, पेन्शनधारकाच्या मृत्यूचं प्रमाणपत्र, पेन्शनधारकाला जारी पीपीओची प्रत (जर उपलब्ध असल्यास), अर्जदाराचं वय/जन्म दाखल्याची कॉपी द्यावी लागेल. पेन्शनधारकासह कुटुंबातील सदस्याचं जॉइंट अकाउंट नसून सिंगल अकाउंट आहे तर त्यालाही हिच कागदपत्र द्यावी लागतील, शिवाय फॅमिली पेन्शन मिळवण्यासाठी दोन साक्षीदारांची स्वाक्षरी असणारा फॉर्म 14 मध्ये अर्ज द्यावा लागेल. ही सर्व कागदपत्र सेल्फ अटेस्टेड करावी लागतील. हे वाचा-सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! DA सह पूर्ण होतील या 7 मागण्या? कुटुंबातील इतर सदस्य कशाप्रकारे मिळवतील लाभ? मृत पेन्शनधारकाच्या पतीचा किंवा पत्नीचाही मृत्यू झाल्यास कुटुंबातील इतर सदस्यांना पेन्शनचा लाभ मिळतो. कुटुंबातील सदस्याला पीपीओमध्ये फॅमिली पेन्शनसाठी नॉमिनी बनवण्यात आले आहे तर वरील प्रक्रियेप्रमाणेच पालन केलं जाईल. मात्र जर कुटुंबातील या सदस्याचं नाव पीपीओमध्ये समाविष्ट नसेल तर पीपीओ जारी करण्यासाठी त्या कार्यालयाशी संपर्क करावा लागेल जिथे पेन्शनधारकाने अंतिम वेळी काम केलं होतं.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या