Home /News /money /

नशीबच फळफळलं! या भारतीयाने असे जिंकले 24 कोटी रुपये, तुम्ही देखील जाणून घ्या...

नशीबच फळफळलं! या भारतीयाने असे जिंकले 24 कोटी रुपये, तुम्ही देखील जाणून घ्या...

एका भारतीय प्रवाशाला संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE)बंपर लॉटरी आहे. अबूधाबीमध्ये आयोजित बिग तिकीट राफेलमध्ये जॉर्ज जेकब्सने 12 दशलक्ष दिरहॅम म्हणजेच 24 कोटी (3,267,102 डॉलर किंवा 24,09,91,734.89 रुपये) जिंकले आहेत.

    नवी दिल्ली, 06 डिसेंबर: एखाद्याचं नशीब कधी उजळेल ते सांगता येत नाही. UAE मध्ये एका भारतीयासोबतही अशीच 'छप्पर फाडके...' प्रमाणे एक घटना घडली आहे. या भारतीय प्रवाशाला संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) बंपर लॉटरी आहे. अबूधाबीमध्ये आयोजित बिग तिकीट राफेलमध्ये जॉर्ज जेकब्सने 12 दशलक्ष दिरहॅम म्हणजेच 24 कोटी (3,267,102 डॉलर किंवा 24,09,91,734.89 रुपये) जिंकले आहेत. अबू धाबीच्या खलीज टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. जॉर्ज जेकब्सने युएईची राजधानी अबूधाबीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन बिग तिकीट राफेलमध्ये भाग घेतला होता. खलीज टाईम्सच्या अहवालानुसार भारतीय असणारे जॉर्ज जेकब्स दुबईचे रहिवासी आहेत. 51 वर्षीय जॉर्ज वैद्यकीय उपकरण विक्रेते आहेत. आर्थिक चणचण असल्याने या पैशांमुळे आता मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. 30 नोव्हेंबर रोजी जेकब यांनी तिकिट विकत घेतलं होतं. गेल्या दोन वर्षांपासून ते ऑनलाइन तिकीट खरेदी करत आहेत. एका राफेल तिकिटाची किंमत 500 दिरहॅम आहे, पण 1000 दिरहॅम दिल्यानंतर दोन तिकिटांवर एक तिकिट फ्री मिळते. (हे वाचा-अलीकडेच कमाईची सुरुवात केली आहे का? वाचा बचत आणि गुंतवणुकीसाठी BEST TIPS) कुठून खरेदी कराल हे तिकिट? www.bigticket.ae या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही या लॉटरीसाठी तिकीट खरेदी करू शकता. याशिवाय बिग तिकिट स्टोअरमधून देखील या तिकिटाची खरेदी करता येईल. हे स्टोअर अबूधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन हॉल काउंटरजवळ आहे. यापूर्वीही बर्‍याच लोकांनी ही लॉटरी जिंकली आहे. (हे वाचा-नोकरदारांसाठी महत्त्वाचे! EPFO खात्यात अशाप्रकारे घरबसल्या सक्रीय करा तुमचा UAN) अलीकडेच, व्हर्जिनिया, युनायटेड स्टेट्सच्या एका व्यक्तीने व्हर्जिनिया पिक 4 लॉटरी गेममध्ये 25 प्ले जिंकले होते. रेमंड हॅरिंगटन नावाच्या भाग्यवान व्यक्तीने प्रत्येकी 1 डॉलरचे 25 समान तिकिट्स खरेदी केले. अधिकृत वेबसाइटनुसार या व्यक्तीने प्रत्येक तिकिटाचे अव्वल पारितोषिक जिंकले होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या