मराठी बातम्या /बातम्या /मनी /

भारतीय अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा, 8.7% राहणार GDP Growth; वाचा काय आहे Fitch Ratings चा अहवाल?

भारतीय अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा, 8.7% राहणार GDP Growth; वाचा काय आहे Fitch Ratings चा अहवाल?

कोरोना काळामुळे जगभरातील सर्वच अर्थव्यवस्थांप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेची (Indian Economy during Coronavirus Pandemic) परिस्थितीही ढासळली आहे. दरम्यान लॉकडाऊन उठवल्यानंतर या परिस्थितीत बदल होत आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: कोरोना काळामुळे जगभरातील सर्वच अर्थव्यवस्थांप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेची (Indian Economy during Coronavirus Pandemic) परिस्थितीही ढासळली आहे. दरम्यान लॉकडाऊन उठवल्यानंतर या परिस्थितीत बदल होत आहे. भारताची अर्थव्यवस्था सुधारत आहे. जागतिक एजन्सी Fitch Ratings ने भारताचे रेटिंग दीर्घकालीन नकारात्मक दृष्टिकोनासह ट्रिपल-B नकारात्मक (BBB-) कायम ठेवले आहे. फिचच्या माहितीनुसार, मध्यम कालावधीत भारताचा विकासाचा दृष्टीकोन मजबूत दिसत आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत झपाट्याने सुधारणा झाल्याचे फिचने म्हटले आहे. त्यामुळे आर्थिक व्यवस्थेवरील ताण हलका झाला आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये काय असणार जीडीपी वाढ?

या एजन्सीच्या मते, आर्थिक व्यवस्थेवरील दबाव कमी झाल्याने मध्यम मुदतीच्या ग्रोथ आउटलुक संबंधित जोखीम कमी होते. फिचने 2021-22 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 8.7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याच वेळी, रेटिंग एजन्सीने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढ 10 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

हे वाचा-कमी पैशातही लग्नाचा धुमधडाका आहे शक्य; लोकही होतील खूश!

फिचच्या मते, भारताच्या रेटिंगची ही पातळी देशाच्या मध्यम कालावधीतील मजबूत वाढीची शक्यता, परकीय चलनाच्या साठ्यामुळे बाह्य धक्के सहन करण्याची क्षमता, उच्च सार्वजनिक कर्ज आणि कमकुवत आर्थिक क्षेत्र यांच्यात संतुलित आहे.

हे वाचा-Online सेलमध्ये खरंच कमी किमतीत वस्तू मिळतात का? हे आहे डिस्काउंटचं गणित

एजन्सीने म्हटले आहे की भारताचा नकारात्मक दृष्टिकोनामुळे दीर्घ काळासाठी सरकारच्या कर्जाबाबत अनिश्चिततेची परिस्थिती दाखवत आहे. फिचने असेही म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता अजूनही आहे. मात्र आता अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम आता पूर्वीपेक्षा खूपच कमी होईल.

First published: