आर्थिक मंदीचं हे आहे सर्वात मोठं कारण, RBI ने 13 शहरांमध्ये केला सर्व्हे

आर्थिक मंदीचं हे आहे सर्वात मोठं कारण, RBI ने 13 शहरांमध्ये केला सर्व्हे

देशातल्या आर्थिक मंदीला मागणी आणि पुरवठ्याचं बिघडलेलं गणित जबाबदार आहे,असं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटलं आहे. मागणी आणि पुरवठा यात घट झाल्याने आर्थिक मंदीचं संकट ओढवलं आहे.

  • Share this:

मुंबई, 5 ऑक्टोबर : देशातल्या आर्थिक मंदीला मागणी आणि पुरवठ्याचं बिघडलेलं गणित जबाबदार आहे,असं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटलं आहे. मागणी आणि पुरवठा यात घट झाल्याने आर्थिक मंदीचं संकट ओढवलं आहे.घटलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारी यामुळे सामान्य लोकांना उत्पन्नात वाढ होण्याची आशा राहिलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये नकारात्मकता दिसून येतेय.

गरजेच्या वस्तूंच्या खरेदीबद्दल मात्र लोकांना आत्मविश्वास आहे.रिझर्व्ह बँकेने देशातल्या 13 शहरांमध्ये 5 हजार 192 घरांचा सर्व्हे केला. यात लोकांना अर्थव्यवस्था आणि रोजगारीबद्दल प्रश्न विचारले. या सर्व्हेमध्ये अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, दिल्ली, मुंबई या शहरांचा समावेश होता. महागाई आणि उत्पन्नाबद्दलचे प्रश्नही लोकांना विचारण्यात आले.

(हेही वाचा : Save Aarey प्रमाणेच या 5 आंदोलनांत लोकांनी पणाला लावले होते जीव)

उद्योगांची घसरण

देशात 8 क्षेत्रांतल्या उद्योगांची घसरण झाली आहे. कोळसा, कच्चं तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण कारखान्यांची उत्पादनं, खतं, पोलाद, सिमेंट आणि वीजपुरवठा या क्षेत्रांतल्या उद्योगांची घसरण झालीय.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ही घसरण मोठी आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या उद्योगांची 4.7 टक्के वाढ होती. आता मात्र ही वाढ उणे 0.5 टक्के आहे.

ही आकडेवारी सरकारनेच जाहीर केली आहे. कोळशामध्ये 8.6 टक्के, कच्चं तेल 5.4 टक्के, नैसर्गिक वायू 3.9 टक्के, सिमेंट 4.9 टक्के आणि वीजपुरवठा 2.9 टक्के एवढी नकारात्मक वाढ झाली.

(हेही वाचा : इम्रान खान यांचा काश्मीरसाठी अट्टाहास पण काय आहे पाकसमोरची खरी समस्या?)

कार उद्योग आणि रिअल इस्टेट संकटात

भारताच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. तरीही कार उद्योग,रिअल इस्टेट यासारखे मोठे उद्योग संकटात आहेत. भारतीय वाहन उद्योगाला सलग दहाव्या महिन्यात तोटा सहन करावा लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत मागणी 30 टक्क्यांनी घटली आहे.

====================================================================================================

VIDEO : आरेतील झाडे तोडण्यावरून आव्हाडांचा युती सरकारवर घणाघात

Published by: Arti Kulkarni
First published: October 5, 2019, 8:50 PM IST

ताज्या बातम्या