Home /News /money /

भारतात मंदी आणखी बिकट होणार, GDP बद्दल वर्ल्ड बँकेने केला हा दावा

भारतात मंदी आणखी बिकट होणार, GDP बद्दल वर्ल्ड बँकेने केला हा दावा

भारताचा GDP खालावल्यामुळे मोदी सरकारसमोर अर्थव्यवस्था सुधारण्याचं आव्हान आहे. त्यातच आता वर्ल्ड बँकेने, 2019-2020 या वर्षात GDP 5 टक्केच राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

    वॉशिंग्टन, 9 जानेवारी : भारताचा GDP खालावल्यामुळे मोदी सरकारसमोर अर्थव्यवस्था सुधारण्याचं आव्हान आहे. त्यातच आता वर्ल्ड बँकेने, 2019-2020 या वर्षात GDP 5 टक्केच राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. असं असलं तरी 2020-2021 या वर्षात आर्थिक विकास दर 5.8 टक्क्यांवर पोहोचू शकतो, असंही वर्ल्ड बँकेने म्हटलं आहे. 2019 मध्ये जून ते सप्टेंबर या काळात भारताचा GDP 4.5 पर्यंत खाली आला होता. गेल्या सहा वर्षातला हा नीचांकी दर आहे. 11 वर्षांतली मंदगती उत्पादनात झालेली घट आणि प्रमुख उत्पादन क्षेत्रांतली खराब कामगिरी ही यामागची कारणं आहेत. वर्ल्ड बँकेच्या जागतिक आर्थिक शक्यतांच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. बँकिंगच्या व्यतिरिक्त असलेल्या वित्तीय कंपन्यांच्या कर्ज वितरणात मंदीच सुरू राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारताचा आर्थिक विकास दर 2020-21 मध्ये सुधारेल आणि तो 5.8 टक्क्यांवर जाईल, असं सांगण्यात येतंय. ही गेल्या 11 वर्षांतली सगळ्यात मंदगतीने होणारी वाढ असेल. वर्ल्ड बँकेच्या अहवालात काय आहे? गैरबँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात कर्जवितरणात आलेल्या मंदीमुळे भारतात मागणी घटली आहे. भारतात कर्जाची उपलब्धता तसंच क्रयशक्ती कमी झाल्याने आर्थिक वाढीचा दर घटला आहे, असं या अहवालात म्हटलं आहे. (हेही वाचा : पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी मोदी सरकारने बनवला नवा अ‍ॅक्शन प्लॅन) 2019 या वर्षात भारतात आर्थिक वाढीचा दर घटला. उत्पादन आणि कृषी क्षेत्रातल्या अधोगतीचा यावर परिणाम झाला. त्याचवेळी सरकारी खर्चातून सरकारी सेवांसाठी मात्र चांगली आर्थिक तरतूद झाली, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. याबद्दल केली प्रशंसा स्वयंपाकाच्या गॅसवरचं अनुदान क्रमश: बंद केल्याच्या भारताच्या प्रयत्नांची वर्ल्ड बँकेने प्रशंसा केली आहे. अनुदान हटवल्याने हा काळा बाजार रोखला गेला, असं वर्ल्ड बँकेने म्हटलं आहे. जागतिक मंदीच्या या काळात अमेरिकेच्या आर्थिक विकासाचा दर कमी होण्याची चिन्हं आहेत,असंही अहवालात म्हटलं आहे. ======================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: GDP, Money

    पुढील बातम्या