Indian Air Force Recruitment 2019 : 10वी उत्तीर्ण असलेल्यांना आहे 'या' पदांवर संधी

वायुसेनेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. जाणून घ्या अर्ज करायची शेवटची तारीख

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 05:33 PM IST

Indian Air Force Recruitment 2019 : 10वी उत्तीर्ण असलेल्यांना आहे 'या' पदांवर संधी

मुंबई, 08 मे : सर्वसाधारण असा समज आहे की वायुसेनेत नोकरी हवी असेल तर मोठी पदवी हवी. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की वायुसेनेत दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरी आहे. तुम्हाला भारतीय वायुसेनेबरोबर काम करायचं असेल तर चांगली संधी आहे. वायुसेनेनं प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशनवरून कळतंय की ग्रुप सी सिविलीयन पेंटरच्या पदासाठी अर्ज मागवलेत. या पदांसाठी अर्ज करायची शेवटची तारीख आहे 10 जून 2019.

आता तुम्हाला खोटी नोट देऊन कुणी फसवू शकणार नाही, RBI आणतेय 'ही' सुविधा

महत्त्वाची तारीख

अर्जाची अंतिम तारीख 10 जून 2019

Indian Air Force: पदांची माहिती

Loading...

ग्रुप 'C' सिविलियन-पेंटर: 01 पद

पदवी नसेल तरी मिळेल या बड्या ई कॉमर्स कंपनीत नोकरी

शैक्षणिक योग्यता : उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण असला पाहिजे. सोबत कॅटरिंगमध्ये डिप्लोमा, डिगरी असावी. शिवाय ITI सर्टिफिकेट घेतलेलं असावं.

वयाची मर्यादा : कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25 वर्ष. सरकारी नियमांप्रमाणे आरक्षित श्रेणीसाठी वयाच्या मर्यादेत सवलत आहे.

रिक्षा ड्रायव्हरनं खरेदी केला 1.6 कोटींचा बंगला, सत्य तपासताना आयकर अधिकाऱ्यांच्या आले नाकीनऊ

वेतन : 7वी सीपीसी लेवल-2 मॅट्रिक्सप्रमाणे पगार मिळेल.

सैन्यात नोकरी हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. आता या व्हेकन्सीमुळे ते पूर्ण करायचे प्रयत्न अनेक जण करू शकतात.


VIDEO : राज ठाकरे शिवसेना सोडताना संपर्कात होते, नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 05:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...