Home /News /money /

Indiamart च्या शेअरमध्ये आज 14 टक्के घसरण, वर्षभरात शेअरची किंमत निम्म्यावर; काय आहे कारण?

Indiamart च्या शेअरमध्ये आज 14 टक्के घसरण, वर्षभरात शेअरची किंमत निम्म्यावर; काय आहे कारण?

Indiamart शेअर मंगळवारी 14.27 टक्क्यांच्या घसरणीसह 5,005 वर बंद झाला. 5 फेब्रुवारी 2021 रोजी या स्टॉकने 9950 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

    मुंबई, 25 जानेवारी : इंडियामार्ट इंटरमॅशच्या लिमिटेड शेअरमध्ये (Indiamart Share) आज मोठी घसरण झाली. डिसेंबर 2021 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल सादर केल्यानंतर, स्टॉक आज दबावाखाली दिसला. Indiamart शेअर मंगळवारी 14.27 टक्क्यांच्या घसरणीसह 5,005 वर बंद झाला. 5 फेब्रुवारी 2021 रोजी या स्टॉकने 9950 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यानुसार आतापर्यंत त्यात सुमारे 50 टक्के घट झाली आहे. हा स्टॉक गेल्या 11 दिवसात 25 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे. या B2B ई-कॉमर्स फर्मने तिसऱ्या तिमाहीच्या निकालांमध्ये एकत्रित निव्वळ नफ्यात 12.4 टक्के घट नोंदवली आहे. या कालावधीत कंपनीचा नफा 70 कोटी रुपयांवर आला आहे. जर गतवर्षीच्या याच कालावधीत 80.2 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. कंपनीचा महसूल (Indiamart Q3 रेव्हेन्यू) 8.3 टक्क्यांनी वाढून 188 कोटी रुपये झाला आहे जो Q3 FY22 मध्ये 173.6 कोटी होता. शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; सेन्सेक्समध्ये 366 अंकांची तर निफ्टीत 128 अंकांची उसळी शेअरहोल्डर्सना देणार वॅल्यू इंडियामार्ट इंटरमॅश लिमिटेडचे ​​मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश अग्रवाल म्हणाले, आम्हाला या तिमाहीतील चांगल्या आर्थिक कामगिरीचा अहवाल सादर करताना आनंद होत आहे. या कालावधीत आमचा ग्राहकवर्ग चांगला मार्जिन आणि कॅश फ्लोसह वाढला आहे. लोकांनी इंटरनेटचा अवलंब केल्याने, आम्ही आमच्या व्यवसायाचे ऑनलाइन व्यवसायात रूपांतर करत आहोत, ज्यामुळे व्यवसायाला एकंदर बळ मिळत आहे. दिनेश अग्रवाल पुढे म्हणाले की, मजबूत बॅलेन्सशीट आणि कामकाजातून येणारा कॅश फ्लो यामुळे कंपनी येत्या वर्षभरात आपले कर्मचारी आणि उत्पादनांमध्ये गुंतवणूक करेल, ज्यामुळे भागधारकांना दीर्घकालीन मूल्य मिळेल. Google मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी! पुण्यात उघडणार ऑफिस, जाणून घ्या तुम्हाला काय करायचं? Indiamart ची प्राईज हिस्ट्री Indiamart चा स्टॉक सध्या सप्टेंबर 2020 च्या किमतीवर आला आहे. त्यानंतर सप्टेंबर ते डिसेंबर 2020 पर्यंत सुमारे तीन महिने कन्सॉलिडेशन केले. यानंतर, पुढील 2 महिन्यांत फेब्रुवारी 2021 मध्ये शेअरने 9,950 रुपयांचा उच्चांक गाठला. त्यानंतर इंडियामार्टचा शेअर घसरला आणि आतापर्यंत तो सातत्याने खाली जात आहे. आता हा स्टॉक जवळपास 50 टक्क्यांनी घसरला आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या