मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Indiabulls Housing Finance शेअरवर तज्ज्ञांची नजर, काही महिन्यात 20 टक्के रिटर्न्सचा अंदाज

Indiabulls Housing Finance शेअरवर तज्ज्ञांची नजर, काही महिन्यात 20 टक्के रिटर्न्सचा अंदाज

Indiabulls Housing Finance शेअरमध्ये तज्ज्ञांनी यात गुंतवणूकदारांना 'बाय इन द डाउनसाइड' धोरण अवलंबण्याचा सल्ला दिला आहे. कारण अल्पावधीत शेअर 300 रुपये प्रति शेअर पातळीपर्यंत जाऊ शकतो.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 7 डिसेंबर : इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सचा (IndiaBulls Housing Finance) शेअर शुक्रवारी 203 रुपयांच्या निचांकी पातळीवर जाऊन 255 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये पुन्हा प्रॉफिट बुकींग (Profit Booking) दिसली आणि शेवटी NSE वर तो 244.50 रुपयांवर बंद झाला. लाइव्हमिंटच्या अहवालानुसार, शेअर बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की, शेअर बाजारात निगेटिव्ह ट्रेंड कायम राहिल्यास या शेअरमध्ये आणखी घसरण होऊ शकते. परंतु ट्रेंड बदलल्यास या शेअरमध्ये चांगली वाढ दिसून येईल. तज्ज्ञांनी यात गुंतवणूकदारांना 'बाय इन द डाउनसाईड' धोरण अवलंबण्याचा सल्ला दिला आहे. कारण अल्पावधीत शेअर 300 रुपये प्रति शेअर पातळीपर्यंत जाऊ शकतो.

300 रुपयांच्या शॉर्ट टार्गेटसाठी खरेदी करा

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना (Share Market Investors) खरेदीचे धोरण अवलंबण्याचे सुचवताना, चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया म्हणाले, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सच्या शेअरमध्ये शुक्रवारी ओमिक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर जोरदार विक्री सुरू होण्यापूर्वी नवीन नफा मिळवला. चार्ट पॅटर्नवर स्टॉक सकारात्मक दिसतो आणि कोणतीही पडझड ही खरेदीची संधी म्हणून पाहिली पाहिजे. 275 ते 300 रुपयांच्या लेव्हलच्या शॉर्ट टर्म टार्गेटसह खरेदी करता येईल.

केंद्र सरकारडून 22.55 कोटीं नागरिकांच्या खात्या पैसे ट्रान्सफर; तुम्हीही चेक करा

बँकिंग आणि फायनान्शिअल सेक्टरची चांगली कामगिरी

शेअर इंडियाचे रिसर्च हेड आणि उपाध्यक्ष रवी सिंग म्हणाले, कॅपिटल मार्केटशी निगडीत उपक्रमांमध्ये किरकोळ सहभाग वाढल्यामुळे बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर बेंचमार्क इंडेक्सविरुद्ध चांगली कामगिरी करत आहे. गेल्या महिन्यात 203 रुपयांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केल्यानंतर, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स स्टॉक सध्या 245-250 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे. 203 रुपयांच्या पातळीला स्पर्श केल्यानंतर त्यात सतत तेजीचा कल आहे.

शेअर बाजारात दोन दिवसात गुंतवणूकदारांचे 5.80 लाख कोटी बुडाले

आता सर्व टेक्निकल सेटअपवरून असे दिसते की BNP परिबा आर्बिट्रेज आणि सॉक जेन यांच्या विक्रीच्या अहवालानंतरही स्टॉक मजबूत आहे. इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स लक्षणीय अस्थिरतेसह मजबूत आहेत आणि नजीकच्या काळात 300 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतात. ते सध्याच्या स्तरावर 20 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.

First published:

Tags: Investment, Money, Share market