मराठी बातम्या /बातम्या /मनी /

2025मध्ये भारत बनेल जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था, 2030 पर्यंत पोहोचणार तिसऱ्या स्थानावर

2025मध्ये भारत बनेल जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था, 2030 पर्यंत पोहोचणार तिसऱ्या स्थानावर

2020मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) काहीसा धक्का बसला असून अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे

2020मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) काहीसा धक्का बसला असून अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे

2020मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) काहीसा धक्का बसला असून अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 27 डिसेंबर: 2020मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) काहीसा धक्का बसला असून अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. परंतु, पुन्हा 2025 मध्ये ब्रिटनला (Britain) मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था पाचवे स्थान पटकावेल आणि 2030 पर्यंत ती तिसऱ्या स्थानावर येईल, असे मत अभ्यास गटाने वर्तवले आहे.  मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, 2019 मध्ये ब्रिटनला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगात 5 व्या स्थानावर पोहोचली होती. परंतु, 2020 मध्ये काही कारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था 6 व्या स्थानावर आली आहे. 'कोरोना (Corona) महामारीचा काहीसा धक्का भारताच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यामुळे 2019 मध्ये ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला यंदा पुन्हा पिछाडीवर आणले. साधरणातः 2024 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावरच राहिल आणि त्यानंतर ती पुन्हा आघाडी घेईल', असं मत सेंटर फॉर इकॅानॅामिक्स अँड बिझनेस रिसर्चने (सीईबीआर) शनिवारी प्रसिध्द केलेल्या वार्षिक अहवालात (Annual Report) म्हटलं आहे. (हे वाचा-Explained: अमेरिकेच्या अध्यक्षांना स्वतःला माफी देण्याचा अधिकार असतो? ) रुपयाचे मूल्य काहीसे कमजोर राहिल्याने 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला यूकेने मागे टाकल्याचे अहवालात म्हटले आहे. CEBR च्या अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्था 2021 मध्ये 9 टक्क्यांनी तर 2022 मध्ये 7 टक्क्यांनी वाढेल. भारत अर्थिकदृष्ट्या अधिक विकसित झाल्याने ग्रोथ नैसर्गिकरित्या मंदावेल. 2035 मध्ये जीडीपीची (GDP) वार्षिक वाढ 5.8 टक्क्यांपर्यंत खाली जाईल. हा ग्रोथचा (Growth) दर पाहता 2025 मध्ये युकेला, 2027 मध्ये जर्मनीला आणि 2030 मध्ये जपानच्या (Japan) अर्थव्यवस्थेला मागे टाकून 2030 पर्यंत भारत हा जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनलेला असेल. युकेतील अभ्यास गटाच्या अंदाजानुसार,  चीन (China) आणि अमेरिकेत (America) कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता, या स्थितीतून सावरत 2028 मध्ये चीन अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला असेल. 2030 सालाच्या सुरुवातील भारताने मागे टाकण्यापूर्वी डॉलरची स्थिती पाहता जपानची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावरच असेल. तसेच जर्मनी (Germany) चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर जाईल. CEBR ने असं म्हटलं आहे की, कोरोना संकटाचा मोठा झटका या अर्थव्यवस्थेला बसल्याचे भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. (हे वाचा-वाह उस्ताद! चिमुकल्याने तबल्यावर धरला ठेका, VIDEO पाहून नेटकरीही हैराण) 2019मध्ये जीडीपी वाढीचा दर दहा वर्षांच्या तुलनेत नीचांकी 4.2 टक्क्यांवर होता. त्याआधीच्या वर्षातील  6.1 टक्क्यांवरून ही घसरण झाली होती.  बॅंकींग क्षेत्राची (Banking Sector) नाजूक स्थिती, सुधारणांचे समायोजन आणि जागतिक व्यापारातील घसरण या बाबी ग्रोथ धीम्या गतीने होण्यासाठी परिणाम करणाऱ्या ठरल्याचे,सीईबीआरने म्हणले आहे. या अभ्यास गटाच्या अहवालानुसार, कोरोना ही भारतासाठी अर्थिक आणि मानवी आपत्ती ठरली. डिसेंबरच्या मध्यापर्यंत देशभरात 1,40,000 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. हा आकडा अमेरिकेबाहेरील सर्वाधिक आकडा आहे. असे असले तरीही,  हा आकडा प्रति 100,000 मध्ये 10 जणांचा मृत्यू असा आहे, जो की अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत कमी आहे. (हे वाचा-अरे देवा! 2021 मध्येही भयंकर व्हायरसचं संकट? अज्ञात आजाराचा रुग्ण सापडला) 2020 मधील दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते जून) जीडीपीचा दर हा 2019 च्या पातळीपेक्षा 23.9 टक्क्यांनी कमी होता. जागतिक मागणी घटल्याने देशातील एक चतुर्थांश अर्थिक घडामोडी ठप्प झाल्याचेच यातून समजते. त्यातच देशांतर्गत मागणी कमी झाल्याने तसेच कडक लाॅकडाऊनमुळे (Lockdown) देखील परिणाम झाल्याचे दिसून आले, असं या अभ्यासात म्हटलं आहे. हळूहळू निर्बंध उठवल्यानंतर अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात चालना मिळाली. असे असले तरी एकूण अर्थिक घडामोडींचे प्रमाण महामारी येण्यापूर्वीच्या स्थितीच्या तुलनेत कमीच आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यात कृषी (Agriculture) हा महत्वाचा घटक आहे. यंदा सुदैवाने हंगाम चांगला साधला आहे. त्यामुळे ही बाब देखील फायदेशीर ठरु शकणार आहे. 'अर्थिक पुर्नप्राप्तीची गती स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोरोना साथीच्या घडामोडींशी लिंक्ड असेल', असंही सीईबीआरने म्हटले आहे. (हे वाचा-Coronavirus बरोबर आता ब्लॅक फंगसचं सावट; मृत्यूदर वाढला) जगभरातील सर्वाधिक प्रमाणातील लस भारतात मॅन्यूफॅक्चर केली जाते, शिवाय 55 दशलक्ष लोकांना दरवर्षी लस देण्याचे 42 वर्ष जुनं लसीकरणाचं अभियान भारतात आहे. त्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भारत इतर विकसनशील देशांपेक्षा अधिक चांगले ठिकाण आहे.
First published:

Tags: Economy

पुढील बातम्या