मराठी बातम्या /बातम्या /मनी /2050 पर्यंत जगभरातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल भारत - Lancet

2050 पर्यंत जगभरातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल भारत - Lancet

Lancet Medical Journal  च्या एका अभ्यासानुसार 2050 पर्यंत भारत जगभरातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था (3rd Largest Economy)बनेल.  तर 2030 पर्यंत भारताला चौथी मोठी अर्थव्यवस्था बनण्यात यश मिळेल. भारताआधी अमेरिका, चीन आणि जपान या राष्ट्रांची नावं आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : जपानला मागे टाकत 2050 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) जगभरातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारताआधी पहिल्या स्थानावर अमेरिका आणि दुसऱ्या स्थानावर चीन असेल. Lancet Medical Journal च्या एका अभ्यासानुसार हे अनुमान मांडण्यात आले आहेत. या जरनलमध्ये जगभरातील देशांमध्ये विविध स्तरांवर काम करणाऱ्या लोकसंख्येचा अभ्यास करण्यात आला.  2017 मध्ये भारत जगभरातील सातवी मोठी अर्थव्यवस्था होता. याच्याच आधारे या अभ्यासात असे म्हटले आहे की, 2030 पर्यंत भारताला चौथी मोठी अर्थव्यवस्था बनण्यात यश मिळेल. भारताआधी अमेरिका, चीन आणि जपान या राष्ट्रांची नावं आहेत. सध्या भारत जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

केंद्र सरकारचा 2047 पर्यंतचा अंदाज

केंद्र सरकारचा अंंदाज देखील काहीसा असाच आहे. नीती आयोगाचे चेअरमन राजीव कुमार (Rajiv Kumar)  यांनी याच वर्षी मे महिन्यात असे सांगितले होते की, 2047 पर्यंत भारत जगभरातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल. मात्र जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. अशावेळी करण्यात आलेल्या या अंदाजांबाबत खूपच कमी आशावाद पाहायला मिळतो आहे.

भारत 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था नाही बनू शकणार

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जपानच्या सेंटर फॉर इकॉनॉमिक रिसर्च (Center for Economic Research, Japan) ने त्यांच्या एका संशोधनात असे म्हटले होते की, 2029 पर्यंत जपानला मागे टाकत भारत जगभरातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल. जपानच्या या संस्थेने हे अनुमान कोरोना व्हायरसचा उद्रेक होण्याआधी केले होते. मात्र सध्याची देशातील परिस्थिती पाहता भारत 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता धुसर झाली आहे.

(हे वाचा-मराठी माणसाचा अटकेपार झेंडा! श्रीकांत दातार हार्वर्ड बिझनेस स्कूलचे नवे डीन)

लॅन्सेटच्या अहवालात देखील अशी चेतावणी देण्यात आली आहे की, चीन आणि भारतमध्ये काम करण्याऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे.   या दरम्यान नायजेरियामध्ये काम करणारी संख्या वाढेल. असे असले तरी आकडेवारीनुसार भारतामध्ये काम करणारी लोकसंख्या अव्वल असेल.

First published:

Tags: Money