मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Indian Post ची नवी योजना, वाचा कसं असेल देशातील पहिलं फ्री डिजिटल लॉकर

Indian Post ची नवी योजना, वाचा कसं असेल देशातील पहिलं फ्री डिजिटल लॉकर

नोकरीसाठी किमान शिक्षण 10वी आणि त्याचं वय किमान 18 वर्ष तर कमाल 40 वर्ष असावं अशी अट आहे. ST आणि SC कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी वयाच्या नियमांत 5 वर्षांची सूट आहे.

नोकरीसाठी किमान शिक्षण 10वी आणि त्याचं वय किमान 18 वर्ष तर कमाल 40 वर्ष असावं अशी अट आहे. ST आणि SC कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी वयाच्या नियमांत 5 वर्षांची सूट आहे.

भारतीय डाक विभागाने(India Post) आपल्या ग्राहकांसाठी नवीन योजना आणली आहे. या योजनेमुळे आपल्याला पार्सल कलेक्ट करणं आणखी सोपं होणार आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 13 मार्च - ईमेल आणि कुरिअरच्या जमान्यातही महत्त्व अबाधित राहावं यासाठी भारतीय टपाल विभाग (Indian Post) आपल्या ग्राहकांसाठी नवीन योजना आणत असतं. डाक विभागाने आपल्यासाठी आणखी एक सुविधा आणली आहे. इंडियन पोस्ट (India Post) देशात पहिल्यांदाच फ्री डिजिटल लॉकरची सर्व्हिस सुरू करत आहे. पश्चिम बंगालमध्ये या सेवेचा शुभारंभ होणार आहे.  या फ्री डिजिटल लॉकर सर्व्हिसमुळे नागरिकांना लॉकरची सुविधा त्यांच्या सोयीनुसार वापरता येणार आहे. यामुळे पार्सल कलेक्ट करण्याासाठी आणखी सोपं होणार आहे. कशी आहे फ्री डिजिटल लॉकर सुविधा- भारतीय डाक विभागाने सुरू केलेल्या या सुविधेमुळे ग्राहकांच्या पार्सल सेवेत सुलभता येणार आहे. फ्री डिजिटल पार्सल लॉकर सुविधेच्या माध्यमातून कस्टमर्स आपल्या सोयीनुसार पोस्टातून पार्सल कलेक्ट करू शकतील. ही सुविधा विदेशाता चांगलीच प्रसिद्ध आहे. या योजनेला विदेशात मोठा प्रतिसादही मिळाला आहे. त्यापाठोपाठ आता भारतातही ही सुविधा आणण्यात येत आहे. वाचा - फोन खरेदी करताय तर जरा थांबा! कमी किंमतीत विकत घेऊ शकता नवा मोबाइल भारतात पहिल्यांदाच अशी सुविधा आणली गेली आहे. कोलकात्यामध्ये भारतीय डाक विभागामार्फत (India Post) च्या सेक्टर 5 च्या शाखेत या सुविधेचा शुभारंभ होणार आहे. लाईव्ह मिंटने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल विभागाचे चीफ पोस्ट मास्टर जनरल गौतम भट्टाचार्य यांनी सांगितलं आहे की,  "भारतात पहिल्यांदाच डिजिटल पार्सल लॉकरची सर्विस सुरू होत आहे.  ही सुविधा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी जास्त महत्वाची असणार आहे." कुणासाठी आहे फ्री डिजिटल लॉकर सुविधा फ्री डिजिटल लॉकर सुविधा ही वर्किंग क्लासच्या लोकांनासाठी जास्त महत्वाची आहे. अर्थात ज्यांच्या घरी पार्सल कलेक्ट करण्यासाठी त्या-त्या वेळेत कुणी उपलब्ध नसतं त्यांना ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे. म्हणजेच, आपल्या ऑफिसचं काम संपवून लोक आता त्यांच्या वेळेनुसार पार्सल रिसिव्ह करण्यासाठी पोस्टात जाऊ शकतात. या सुविधेचा लाभ घेणाऱ्या लोकांना, भारतीय डाक जिथे त्यांचं पार्सल ड्रॉप करणार आहे, त्याचा पत्ता देईल आणि त्यासाठी खास लॉकर नंबरही दिला जाईल. त्यानंतर पार्सल लॉकरमध्ये पार्सल ड्रॉप केलं जाईल. त्यानंतर कस्टरमरला एक विशेष OTP दिला जाईल. पार्सल ड्रॉप झाल्यानंतर पुढील 7 दिवसात केव्हाही आपलं पार्सल घेता येणार आहे. त्यामुळे या सुविधेला आता कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागणार आहे. वर्किंग क्लासच्या लोकांसाठी ही सुविधा असल्यामुळे नक्कीच ही योजना विदेशाप्रमाणे भारतातही चांगली यशस्वी होईल असा विश्वास  व्यक्त केला जात आहे. अन्य बातम्या - फोन खरेदी करताय तर जरा थांबा! कमी किंमतीत विकत घेऊ शकता नवा मोबाइल SBI ग्राहकांना सर्वात मोठा झटका! FD वर मिळणार आता ‘इतकं’ कमी व्याज
First published:

Tags: Parcel, Post office

पुढील बातम्या