Home /News /money /

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या 'या' सेवेसाठी अधिक पैसे मोजावे लागणार; चेक करा नवे शुल्क

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या 'या' सेवेसाठी अधिक पैसे मोजावे लागणार; चेक करा नवे शुल्क

बँकिंग आणि वित्तीय सेवा होस्ट करण्यासाठी केंद्र सरकार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि आघाडीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp यांच्यात भागीदारी करण्याचा विचार करत आहे.

    मुंबई, 19 जून : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) तुमचे खाते असेल आणि तुमच्याकडे बँकेचे व्हर्च्युअल डेबिट कार्ड (Vertual Debit Card) असेल, तर तुमच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. IPPB व्हर्च्युअल डेबिट कार्डधारकांना आता वार्षिक देखभाल आणि रिइश्यू शुल्क (maintenance and reissue charges) भरावे लागेल. यासाठी ग्राहकांना 25-25 रुपये मोजावे लागणार आहेत. हे शुल्क 15 जुलै 2022 पासून लागू होईल. प्रीमियम खात्यांना (SBPRMs) या शुल्कातून सूट दिली जाईल. IPPB ने ग्राहकांना डिजिटल पेमेंट इकोसिस्टमकडे नेण्यासाठी व्हर्च्युअल डेबिट कार्ड लाँच केले होते. केंद्राकडून डिजिटल पेमेंटलाही (Digital Payment) चालना मिळत आहे. डिजिटल डेबिट कार्ड म्हणजे काय? हे एक डिजिटल कार्ड आहे जे ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाऊ शकते. हे कार्ड एखाद्या कार्डाप्रमाणेच भारतातील कोणत्याही व्यापारी वेबसाइट/ऑनलाइन पोर्टलवर ऑनलाइन खरेदीसाठी वापरले जाऊ शकते. परंतु तेथे RuPay कार्ड स्वीकारले जाते. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे ग्राहक मोबाईल बँकिंग अॅपवर जनरेट करू शकतात. Gold Price: सोन्याच्या दरात आठवडाभरात घसरण, किती स्वस्त झालं सोनं? बँकिंग आणि वित्तीय सेवा होस्ट करण्यासाठी केंद्र सरकार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि आघाडीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp यांच्यात भागीदारी करण्याचा विचार करत आहे. अधिकाधिक लोकांना डिजिटल सेवांशी जोडणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे आणि यासाठी ते WhatsApp आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्यात आणखी भागीदारीचा विचार करू शकते. यामुळे बँकेच्या ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार असून त्यांना मूलभूत कामांसाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. इंडियन पोस्ट पेमेंट बँक एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे जिथे केंद्र सरकारचा 100% हिस्सा आहे. पोस्ट विभागाच्या अंतर्गत पेमेंट बँक म्हणून त्याची स्थापना करण्यात आली आहे. बॅंक बॅलन्सचा तपशील, नवीन खात्यासाठी अर्ज आणि इतर बॅंकिंग ऑपरेशन्ससाठी पुढील 60 दिवसांसाठी एक पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे. RBI कडून 'या' बँकेचा परवाना सस्पेंड, तुमचंही बँकेत खातं असेल तर काय परिणाम होईल? व्हर्च्युअल कार्ड कसे तयार करावे? व्हर्च्युअल डेबिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी, प्रथम IPPB अॅप डाउनलोड करा. त्यानंतर रुपे कार्डवर क्लिक करून व्हर्च्युअल डेबिट कार्ड निवडा. नवीन पेजवर रिक्वेस्ट व्हर्च्युअल डेबिट कार्ड वर क्लिक करा. त्यानंतर अटी आणि शर्ती स्वीकारा आणि प्रोसीड बटण दाबा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP एंटर करा आणि तुमचे डिजिटल डेबिट कार्ड तयार होईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Post office

    पुढील बातम्या