Home /News /money /

Indian Post Payment Bank ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' व्यवहारांवर भरावं लागणार शुल्क

Indian Post Payment Bank ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' व्यवहारांवर भरावं लागणार शुल्क

AePS सेवा ही बँकिंग आधारित मॉडेल सेवा आहे ज्यामध्ये आधार पडताळणीद्वारे, ती PoS म्हणजेच MicroATM द्वारे ऑनलाइन व्यवहार प्रदान करते. हे ग्राहकांना एकूण 6 प्रकारच्या व्यवहारांची सुविधा देते.

    मुंबई, 28 मे : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (Indian Post Payment Bank) ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम (AePS) वर व्यवहार शुल्क (Transaction Charges) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात माहिती देताना, पोस्ट ऑफिसने (Post Office) एक अधिसूचना जारी करून सांगितले आहे की 15 जून 2022 नंतर AePS व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. हे अतिरिक्त शुल्क ठराविक व्यवहार मर्यादेनंतर भरावे लागेल. IPPB ने आपल्या अधिसूचनेत सांगितले आहे की, जर तुम्ही एका महिन्यात तीन पर्यंत AePS व्यवहार केले तर अशा परिस्थितीत तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. दुसरीकडे, तीनपेक्षा जास्त व्यवहारांवर रोख जमा आणि काढण्यासाठी, तुम्हाला 20 रुपये शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क जीएसटीचे शुल्क म्हणून घेतले जाईल. दुसरीकडे, मिनी स्टेटमेंट मिळाल्यावर, तुम्हाला जीएसटी म्हणून 5 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. Multibagger Share: गुंतवणूकदारांचे पैसे 'या' शेअरमुळे महिनाभरात दुप्पट, तुमच्याकडे आहे का हा शेअर? AePS सेवा म्हणजे काय? AePS सेवा ही बँकिंग आधारित मॉडेल सेवा आहे ज्यामध्ये आधार पडताळणीद्वारे, ती PoS म्हणजेच MicroATM द्वारे ऑनलाइन व्यवहार प्रदान करते. हे ग्राहकांना एकूण 6 प्रकारच्या व्यवहारांची सुविधा देते. LIC New Policy: विमा रत्न पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे, चेक करा संपूर्ण कॅलक्युलेशन या बँकिंग सुविधा AePS द्वारे उपलब्ध आहेत >> मिनी स्टेटमेंट (Mini statement) >> रकम जमा करा (Money Deposite) >> पैसे काढणे (Money Withdrawl) >> शिल्लक चौकशी (Balance Inquiry) >> आधार ते आधार निधी हस्तांतरण ((Aadhaar Card Cash Transfer) >> भीम आधार पे (BHIM Aadhaar Pay)
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Aadhar card, Investment, Post office

    पुढील बातम्या