मराठी बातम्या /बातम्या /मनी /सेव्हिंग करा आणि मिळवा 7 हजारांची सूट; पोस्टानं जाहीर केली खास ऑफर

सेव्हिंग करा आणि मिळवा 7 हजारांची सूट; पोस्टानं जाहीर केली खास ऑफर

पोस्टातील बचत खात्यावर सध्या 4 टक्के दरानं व्याज मिळतं. त्याचप्रमाणे कर सवलतही (Tax Benefit) मिळते. त्यामुळं पोस्टात गुंतवणूक केल्याचा दुहेरी लाभ मिळतो.

पोस्टातील बचत खात्यावर सध्या 4 टक्के दरानं व्याज मिळतं. त्याचप्रमाणे कर सवलतही (Tax Benefit) मिळते. त्यामुळं पोस्टात गुंतवणूक केल्याचा दुहेरी लाभ मिळतो.

पोस्टातील बचत खात्यावर सध्या 4 टक्के दरानं व्याज मिळतं. त्याचप्रमाणे कर सवलतही (Tax Benefit) मिळते. त्यामुळं पोस्टात गुंतवणूक केल्याचा दुहेरी लाभ मिळतो.

    मुंबई 9 जुलै: इन्कम टॅक्समध्ये (Income Tax) सूट मिळवण्यासाठी गुंतवणुक पर्याय शोधत असाल तर पोस्टातील (Post Office) गुंतवणूक आपल्या फायद्याची ठरु शकते. सुरक्षितता, उत्तम परतावा आणि कर सवलत ही पोस्ट खात्याच्या गुंतवणूक योजनांची खास वैशिष्ट्ये आहेत. पोस्टातील बचत खातंही उत्तम व्याज आणि कर सवलत मिळवून देतं. बँकेतील बचत खात्यावर सरासरी 2.5 ते 3.5 टक्के व्याज मिळतं. तेच पोस्टातील बचत खात्यावर सध्या 4 टक्के दरानं व्याज मिळतं. त्याचप्रमाणे कर सवलतही (Tax Benefit) मिळते. त्यामुळं पोस्टात गुंतवणूक केल्याचा दुहेरी लाभ मिळतो.

    पोस्टात तुमचं एकट्याचं खातं असेल तर एका आर्थिक वर्षात जमा होणाऱ्या 3 हजार 500 रुपयांच्या व्याजावर कोणताही कर लागत नाही. संयुक्त खातं (Joint Account) असेल तर सात हजार रुपयांच्या व्याजावर कर सवलत मिळते. त्याशिवाय बँका आणि पोस्टातील बचत खात्यावर मिळणारे व्याज हे उत्पन्नात (Income) मोजले जाते. त्यावर इन्कम टॅक्स कलम 80TTA नुसार डिडक्शनचा लाभ मिळतो.

    SBI Alert: 10-11 तारखेला कोट्यवधी ग्राहकांना मिळणार नाहीत महत्त्वाच्या सेवा, हे आहे कारण

    एका आर्थिक वर्षात 10 हजार रुपयापर्यंत व्याज करमुक्त आहे. त्यामुळं पोस्टात संयुक्त बचत खाते असेल तर कर मुक्त व्याज 7 हजार आणि 80TTA नुसार 10 हजार अशी एकूण 17 हजार रुपयांच्या व्याजावर करात सवलत मिळते.

    मोदी सरकारचा मोठा निर्णय, या महत्त्वाच्या बँकेतील संपूर्ण भागीदारी विकणार

    पोस्टात बचत खाते (Savings Account) उघडणे अतिशय सोपे आहेत. फक्त 500 रुपये भरून खाते उघडता येते. एक व्यक्ती आपल्या एकट्याच्या नावावर किंवा दोन व्यक्ती संयुक्त खातं उघडू शकतात. 10 वर्षाखालील मुलांचे पालकांच्या नावानं खातं उघडता येतं. संपूर्ण आर्थिक वर्षात 500 रुपयांपेक्षा अधिक रक्कम खात्यात भरली नाही तर 100 रुपये मेटेनन्स चार्ज कापला जातो. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपासून शेवटच्या दिवसापर्यंत असेलल्या शिलकीवर व्याज मोजणी होते. खात्यातील शिल्लक पूर्ण संपली तर खातं आपोआप बंद होते. मात्र आता एप्रिल महिन्यात अर्थ मंत्रालयानं काढलेल्या एका अधिसूचनेनुसार काही ठराविक वर्गातील लोकांना शून्य शिल्लक खात्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यात प्रामुख्यानं सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी, वृद्ध नागरिक आणि अज्ञान मुलांचे पालक यांचा समावेश आहे.

    First published:
    top videos

      Tags: Investment, Money