• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • IPO: केवळ 290 रुपयांची गुंतवणूक करून लखपती होण्याची संधी, वाचा कुठे आणि कसे गुंतवायचे पैसे

IPO: केवळ 290 रुपयांची गुंतवणूक करून लखपती होण्याची संधी, वाचा कुठे आणि कसे गुंतवायचे पैसे

शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी आयपीओ (IPO) अर्थात इनिशिअल पब्लिक ऑफर (Initial Public Offer) हा एक पर्याय आहे. यामध्ये शेअर बाजारातून निधी उभा करण्यासाठी कंपन्या पहिल्यांदा आपले शेअर्स विक्रीसाठी खुले करतात

  • Share this:
नवी दिल्ली 19 जून : शेअर बाजारात (Share Market) अगदी कमी कालावधीत चांगली कमाई करता येते. योग्य शेअरमध्ये योग्य वेळी गुंतवणूक केल्यास शेअर बाजारात मोठा फायदा मिळू शकतो. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी आयपीओ (IPO) अर्थात इनिशिअल पब्लिक ऑफर (Initial Public Offer) हा एक पर्याय आहे. यामध्ये शेअर बाजारातून निधी उभा करण्यासाठी कंपन्या पहिल्यांदा आपले शेअर्स विक्रीसाठी खुले करतात. त्यामुळे याची किंमत कमी असते. ऑफरचा कालावधी संपला की शेअर बाजारात कंपनीची नोंदणी होते. कंपनीचा इतिहास, प्रवर्तक, व्यवसाय क्षेत्र, आर्थिक स्थिती, शेअर्स खरेदीला मिळालेला लोकांचा प्रतिसाद या सगळ्या बाबीनुसार नोंदणीच्या दिवशी त्या कंपनीच्या शेअरची किंमत ठरते. बहुतांश वेळा शेअरची किंमत ऑफर प्राइसपेक्षा अनेक पटींनी वाढते. त्यामुळे अगदी अल्पावधीत शेअरधारकांचा मोठा फायदा होतो. सध्या अशा एका आयपीओमधून लक्षाधीश होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. 23 जून रोजी म्हणजे बुधवारी कृषी-रसायन क्षेत्रातल्या इंडिया पेस्टिसाइड्स (India Pesticides) या कंपनीचा आयपीओ दाखल होत आहे. यात गुंतवणूक करणं लाभदायी ठरू शकतं. पैसे कमावण्याची सुवर्णसंधी, Aadhaar केंद्राची फ्रेंचायझी घेऊन सुरू करा व्यवसाय 25 जूनपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी : इंडिया पेस्टिसाइड्सच्या आयपीओमध्ये 23 जून ते 25 जून या कालावधीत पैसे गुंतवता येतील. या आयपीओतील शेअर्सचा किंमत पट्टा 290-296 रुपये असा निश्चित करण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार, अँकर गुंतवणूकदार 22 जून रोजी शेअर्ससाठी बोली लावू शकतील. कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसई (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे एनएसई (NSE) अशा दोन्ही ठिकाणी नोंदणीकृत केले जातील. 800 कोटींचा आयपीओ : इंडिया पेस्टिसाइड्स आयपीओचं एकूण मूल्य 800 कोटी रुपये आहे. म्हणजेच या आयपीओच्या माध्यमातून कंपनी बाजारातून 800 कोटी रुपये जमा करेल. कंपनी 100 कोटींचा फ्रेश इश्यू जारी करेल. त्याचबरोबर प्रवर्तक आनंद स्वरूप अग्रवाल 281.4 कोटी रुपयांच्या विक्रीची ऑफर आणतील. इतकेच नाही तर शेअरधारकांचे 418.6 कोटी रुपयांचे शेअर्सही विकले जातील. SBI कडून कोरोना रुग्णांना दिलासा! स्वस्त दरात मिळेल वैयक्तिक कर्ज, अशी आहे योजना कंपनीची योजना काय आहे? उत्तर प्रदेशमधली ही कंपनी 75 कोटींच्या आयपीओ पूर्व नियोजनाचा विचार करू शकते. यासाठी कंपनी बँकर्सशी सल्लामसलत करेल. नवीन इश्यूची रक्कम भांडवली गरजा आणि कॉर्पोरेट व्यवसायासाठी वापरली जाईल, असं कंपनीनं म्हटलं आहे. अ‍ॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड यांची या आयपीओचे व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड त्याचे रजिस्ट्रार आहेत. कंपनीचा व्यवसाय काय आहे ? इंडिया पेस्टिसाइड्स ही कृषी रसायन क्षेत्रातली कंपनी आहे. संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करणारी ही तांत्रिक कंपनी आहे. हर्बिसाइड्स, कीटकनाशके आणि बुरशीनाशक फॉर्म्युलेशन्सचाही तिचा व्यवसाय आहे. सध्या ही कंपनी अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडिएंट्स (API) तयार करीत आहे. Captan, Folpet and Thiocarbamate या कीटकनाशकांच्या उत्पादनातली ही जगातल्या सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे.
Published by:Kiran Pharate
First published: