जुलैच्या पहिल्या आठवड्यात सादर होईल अर्थसंकल्प, सर्वसामान्यांना मिळू शकतो 'हा' दिलासा

जुलैच्या पहिल्या आठवड्यात सादर होईल अर्थसंकल्प, सर्वसामान्यांना मिळू शकतो 'हा' दिलासा

मोदी सरकारच्या शपथविधीनंतर आता जुलैमध्ये पूर्ण बजेट मांडलं जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

  • Share this:

मुंबई, 31 मे : मोदी सरकारच्या शपथविधीनंतर आता जुलैमध्ये पूर्ण बजेट मांडलं जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. अजून सरकारकडून कुठलीही अधिकृत तारीख घोषित झालेली नाही. अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलैमध्ये घोषित होणाऱ्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल होणार नाही. यामुळे रिव्हेन्यू कलेक्शन कमी झालंय. बजेटनंतर थेट करावर टास्क फोर्सचा रिपोर्ट येईल. पण सध्या तरी डायरेक्ट टॅक्समध्ये काही बदल केला जाणार नाही.

3 लाखात सुरू करा 'हा' व्यवसाय, दर महिन्याला 2 लाख रुपये कमाई नक्की

असं म्हणतात सर्वसाधारण जनतेला दिलासा देण्यासाठी कराव्यतिरिक्त दुसरं एखादं पाऊल उचललं जाऊ शकतं. अंतरिम बजेटमध्ये सरकारनं करात 5 लाखापर्यंत सूट दिली होती.

देशातील सर्वात गरीब खासदार; ओडिशाच्या मोदींबद्दल तुम्हाला माहीत आहे?

काय असतं पूर्ण बजेट?

नवं सरकार आल्यानंतर वर्षभराच्या खर्चाचा लेखाजोखा सादर केला जातो. यालाही पूर्ण बजेट म्हटलं जातं. यानुसार सरकारची मिळकत आणि खर्च सरकार जाहीर करतं. हे पूर्ण वर्षाकरता असतं. पूर्ण बजेटच्या आकड्यांवरून सरकार संसदेला येणाऱ्या आर्थिक वर्षात कशावर किती खर्च केला जाईल, ते सांगतं.

'प्रत्यक्ष मतदानापेक्षा 459 जास्त मते मोजली गेली', राजू शेट्टींच्या आरोपाने खळबळ

अंतरिम बजेट आणि पूर्ण बजेटमध्ये काय आहे अंतर?

अंतरिम बजेट काही महिन्यांसाठी घोषित केलं जातं तर नवं सरकार आल्यानंतर पूर्ण बजेट सादर होतं.

लोकसभा निवडणुकीआधी सादर झालं अंतरिम बजेट

1 फेब्रुवारी 2019 रोजी पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात 5 लाखापर्यंत कमाई असणाऱ्या नोकरदारांना करमुक्त केलं होतं. पण स्लॅबमध्ये काही बदल नव्हते केले.

VIDEO : नाशिकची 'लेडी सिंघम', दरोडेखोरासोबत एकटीने दिली झुंज

First published: May 31, 2019, 1:57 PM IST

ताज्या बातम्या