बहिण-भावाच्या नात्यामुळे बसणार चीनला फटका, 4000 कोटींचे होणार नुकसान

बहिण-भावाच्या नात्यामुळे बसणार चीनला फटका, 4000 कोटींचे होणार नुकसान

CAIT च्या मते यामुळे चीनचे 4000 कोटींचे नुकसान (Trade Loss) होण्याची शक्यता आहे. याचबरोबर त्यांच्याकडून सीमेवर तैनात भारतीयांना 5000 राखी देखील पाठवण्यात येणार आहेत.

  • Share this:

दिपाली नंदा (CNBC आवाज), नवी दिल्ली, 14 जुलै : देशातील छोट्या व्यापाऱ्यांची संघटना असणाऱ्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने यावर्षी रक्षाबंधनाचा सण पूर्णपणे भारतीय असेल, अशी घोषणा केली आहे. देशभरात त्यांनी 'हिदुस्तानी राखी'  (Hindustani Rakhi) च्या स्वरूपात सण साजरा करण्याची घोषणा केली आहे. CAIT च्या मते यामुळे चीनचे 4000 कोटींचे नुकसान (Trade Loss) होण्याची शक्यता आहे. याचबरोबर त्यांच्याकडून सीमेवर तैनात भारतीयांना 5000 राखी देखील पाठवण्यात येणार आहेत. 3 ऑगस्ट रोजी आलेला रक्षाबंधनाचा सण 'हिंदुस्तानी राखी' स्वरूपात साजरा करण्याची घोषणा CAIT ने केली आहे.

सीएआयटीने असा दावा केला आहे की यावर्षी रक्षाबंधनासाठी वापरण्यात येणाऱ्या राखी किंवा त्या बनवण्याकरता लागणाऱ्या वस्तू, याकरता चिनी मालाचा वापर होणार नाही. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर तैनात जवानांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्याकरता कन्फेडरेशनच्या महिला शाखेकडून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्याकडे  5000 राखी सुपूर्द करण्यात येणार आहेत.  त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक लष्कर रुग्णालयामध्ये  दाखल सैनिकांना आणि पोलिसांना देखील या शाखेतील महिला राखी बांधणार आहेत.

(हे वाचा-नात्याला होता पालकांचा विरोध! समलैंगिक गर्लफ्रेंडबरोबर पळून गेली 16 वर्षीय मुलगी)

कन्फेडरेशनचा असा दावा आहे की, देशभरात 40,000 पेक्षा अधिक व्यापारी संघटना (Traders Organisation) आणि 7 कोटी सदस्य त्यांच्याबरोबर जोडले गेले आहेत. चिनी वस्तूंचा बहिष्कार करण्यासाठी कन्फेडरेशनकडून 'भारतीय सामान, हमारा अभिमान'  चालवण्यात येत आहे. कन्फेडरेशनच्या एका अनुमानानुसार दरवर्षी जवळपास 6000 कोटी रुपयांचा राख्यांचा व्यापार होतो. यामध्ये एकट्या चीनचा हिस्सा 4000 कोटी रुपये इतका असतो. कन्फेडरेशनच्या दिल्ली-एनसीआर शाखेचे समन्वयक सुशील कुमार जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी मोठ्या प्रमाणात राख्या चीनमधून देशामध्ये येतात.

(हे वाचा-राजस्थानमधील राजकीय नाट्याला नवे वळण, सचिन पायलट यांच्या नव्या मागणीने खळबळ)

जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार तयार राख्यांबरोबरच त्या बनवण्यासाठी लागणारे फोम, कागद, राखीचा धागा, मोती आणि इतर सजावटी सामान देखील चीनमधून आयात केले जाते. कन्फेडरेशनने यावर्षी चिनी वस्तूंचा बहिष्कार केला आहे. कोणत्याही गोष्टीसाठी चिनी वस्तू वापरल्या जाणार नाही आहेत. त्यामुळे चीनला व्यापारामध्ये साधारण 4 हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागू शकते. कन्फेडरेशनने राज्यातील त्यांच्या इतर शाखांना देखील याबाबत सूचना पाठवली आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 14, 2020, 11:37 AM IST

ताज्या बातम्या