नवी दिल्ली, 6 जानेवारी: घर खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मुंबईतर घरांच्या किंमती या गगणाला भिडल्या आहेत. दरम्यान मुंबईतील एक आलिशान अपार्टमेंटची विक्री झाली आहे. यावेळी विक्रेत्याला मिळालेली किंमत पाहून तुम्ही देखील चकीत व्हाल. अब्जाधीश बिजनेसमन आणि DMart चे संस्थापक राधाकिशन दमाणी यांनी देशातील प्रॉपर्टी मार्केटमधील सर्वात मोठा सौदा केला आहे. दमाणी यांच्या कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी मुंबईत 1,238 कोटी रुपयांना 28 घरे खरेदी केली आहेत. Zapkey.com ने रजिस्ट्रेशन कागदपत्रांचा हवाला देऊन ही माहिती दिली आहे.
यावेळी हा करार महत्त्वाचा आहे. कारण, 2023 च्या अर्थसंकल्पातील घोषणांमुळे 1 एप्रिलपासून सुपर लक्झरी मालमत्तांवर परिणाम होईल असा अंदाज आहे. गृहनिर्माण मालमत्तेसह दीर्घकालीन मालमत्तांच्या विक्रीतून कॅपिटल गेन्सच्या पुनर्गुंतवणुकीवर 10 कोटी रुपयांची मर्यादा अर्थसंकल्पात घालण्यात आली आहे. सध्या अशी कोणतीही लिमिट नाही.
मौल्यवान वस्तू ट्रेन किंवा विमानातच विसरलात? अशी मिळवता येईल परत
डॉक्यूमेंट्सनुसार काही प्रॉपर्टीज कंपन्यांच्या नावावर खरेदी करण्यात आल्या आहेत. राधाकिशन दमाणी, त्यांचे सहकारी आणि कंपन्यांनी खरेदी केलेल्या मालमत्तांचे एकूण कारपेट एरिया 1,82,084 चौरस फूट आहे. ज्यामध्ये 101 कार पार्किंगचा समावेश आहे. सर्व व्यवहारांची रजिस्ट्री 3 फेब्रुवारी 2023 रोजी झाली आहे.
तुमचा PF कट होतो? मग ही बातमी वाचाच, नियमांमध्ये झाले मोठे बदल
मुंबईतील वरळी भागातील अॅनी बेझंट रोडवर असलेल्या थ्री सिक्स्टी वेस्टच्या टॉवर बीमध्ये हे अपार्टमेंट खरेदी केले आहे. या डीलमध्ये विक्रेता बिल्डर सुधाकर शेट्टी आहेत. त्यांनी प्रोजेक्टला रीडेव्हलप करण्यासाठी रिअल इस्टेट डेव्हलपर विकास ओबेरॉय यांच्यासोबत पार्टनरशिप केली आहे. यापैकी बहुतेक अपार्टमेंट्सचा कारपेट एरिया 5,000 चौरस फूट आहे आणि त्यांची किंमत सरासरी 40-50 कोटी रुपये आहे.
23 आलिशान घरांसह अपार्टमेंट विकून प्रत्येकाकडून सुमारे 50-60 कोटी रुपये कमावले आहेत. बिल्डरने ही रक्कम 1000 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली आहे. शेट्टी यांनी ही कर्जाची रक्कम पिरामल फायनान्सकडून घेतली होती. शेट्टी यांनी पिरामल ग्रुपला कर्जाची रक्कम परत केल्याचे सूत्रांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Money