Independence Day 2020 : स्वातंत्र्य दिनानिमित्त Reliance Digital Sale, उरले फक्त 24 तास

Independence Day 2020 : स्वातंत्र्य दिनानिमित्त Reliance Digital Sale, उरले फक्त 24 तास

लॅपटॉप आणि मोबाईल सारख्या वस्तूंवरही मोठा डिस्काऊंट उपलब्ध आहे.

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अद्यापही सर्व बाजारपेठा वेगानं सुरू झाल्या नाहीत. आपल्याला हव्या असलेल्या वस्तू बाजारात जाऊन घेणं शक्य होत नसलं किंवा उपलब्ध नसतं अशावेळी आपल्याकडे ऑनलाइन खरेदी हा सर्वोत्तम पर्याय असतो. अॅमेझॉनप्रमाणेच रिलायन्स डिजिटलवरही खास ऑफर्स सुरू आहेत. या सेलचा लाभ घेण्यासाठी उद्या अंतिम मुदत असणार आहे.

reliancedigital.in या वेबसाईटवर स्वातंत्र्य दिनानिमित्त खास Reliance Digital Sale ग्राहकांसाठी आहे. यामध्ये कपड्यांपासून ते इलेक्ट्रोनिक वस्तूंपर्यंत खास ऑफर्स आणि डिस्काऊंट ग्राहकांना मिळणार आहे. HDFC बँकेच्या कार्डवर ज्यादा 10 टक्के सूटही देण्यात आली आहे.

हे वाचा-Vodafone आणि Airtel ग्राहकांसाठी मोठी बातमी, लवकरच बंद होऊ शकतात 'हे' प्लॅन

11 ऑगस्टपर्यंत होम अप्लायन्स म्हणजे टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मिक्सर आणि स्वयंपाक घरातील इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तुंवर भरगोस सूट देण्यात आली आहे.

याशिवाय लॅपटॉप आणि मोबाईल सारख्या वस्तूंवरही मोठा डिस्काऊंट उपलब्ध आहे. 10th gen लॅपटॉप उपलब्ध असणार आहेत. ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तू आपण आपल्या जवळच्या स्टोअरमधून घेऊन येऊ शकता. यासाठी आपल्याला वेबसाइटवर लॉगइन करायचं आहे. तिथून आपल्या जवळ असणारं दुकानं कोणतं याची माहिती दिली जाणार आहे. हा सेल संपण्यासाठी केवळ 24 तास शिल्लक राहिले आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 10, 2020, 3:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या