Home /News /money /

आठवडाभराच्या घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर; पाहा लेटेस्ट Gold Price

आठवडाभराच्या घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर; पाहा लेटेस्ट Gold Price

गेल्या अनेक सत्रांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण होत होती. परंतु मंगळवारी यात अचानक वाढ झाली आहे. याचाच परिणाम भारतीय बाजारातही सोने दरावर झाला आहे.

  नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : भारतीय बाजारात मंगळवारी सोने दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी 23 फेब्रुवारी 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) 337 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरातही (Silver Price Today) जबरदस्त वाढ झाली आहे. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 46,035 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा दर 68,518 रुपये प्रति किलोग्रॅम होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Markets)आज सोने-चांदी दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. आजचा नवा सोन्याचा दर (Gold Price, 23 February 2021) - दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा दर 337 रुपये प्रति 10 ग्रॅमने वधारला. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा दर 46,372 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याआधीच्या सत्रात हा दर 46,035 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याचा भाव वधारून 1,808 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

  (वाचा - सोनं की FD? यंदा या गुंतवणुकीत मिळतोय सर्वाधिक परतावा)

  चांदीचा आजचा भाव (Silver Price, 23 February 2021) - चांदीच्या दरातही मंगळवारी मोठी वाढ आली. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 1,149 रुपयांनी वधारला आहे. त्यामुळे आज चांदीचा दर 69,667 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोने दरात मोठी वाढ झाली. गेल्या अनेक सत्रांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण होत होती. परंतु मंगळवारी यात अचानक वाढ झाली आहे. याचाच परिणाम भारतीय बाजारातही सोने दरावर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारांउलट, भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत थोड्या प्रमाणात वाढ सुरू आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Delhi, Gold, Gold and silver prices today, Gold prices today, Money, Silver prices today

  पुढील बातम्या