Home /News /money /

Investment Tips: योग्य पद्धतीने वाढवा तुमची संपत्ती, 'या' पाच चुका टाळल्यास होईल जास्त बचत

Investment Tips: योग्य पद्धतीने वाढवा तुमची संपत्ती, 'या' पाच चुका टाळल्यास होईल जास्त बचत

Investment Tips: आपल्या कमाईपेक्षा (Earning) कमी खर्च करून पैसे वाचवू शकता; पण काही वेळा आपल्या लहान-मोठ्या चुकांमुळे (Financial Mistakes) बचत करूनही फायदा होत नाही. अशा चुका आपण सहज टाळू शकतो.

    मुंबई, 14 मे : सध्या जगातली प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपली संपत्ती (Wealth) वाढवण्यात व्यग्र आहे. बचत करण्याची सवय ही पैसा वाढवण्यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट ठरते. कारण तुम्हाला कितीही जास्त पगार असला, तरी तुम्ही बचतच (Savings) केली नाही, तर कधीही रस्त्यावर येऊ शकता. आजकाल इंटरनेटवरसुद्धा अनेक तज्ज्ञ पैशांची बचत करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची माहिती देतात. परंतु काही वेळा त्या योजना कठीण वाटतात. सामान्य माणसाला त्यांचं पालन करणंही अवघड वाटतं. काही जण पारंपरिक बचत मार्गांचा अवलंब करतात; मात्र त्यातून प्रत्येक वेळी अपेक्षित फायदा होईलच असं नाही. बचत करण्यासाठी कुठे तरी गुंतवणूक (Investment) करावी लागते आणि गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला अगोदर काही पैसे वाचवावे लागतात. आपल्या कमाईपेक्षा (Earning) कमी खर्च करून पैसे वाचवू शकता; पण काही वेळा आपल्या लहान-मोठ्या चुकांमुळे (Financial Mistakes) बचत करूनही फायदा होत नाही. अशा चुका आपण सहज टाळू शकतो. याबाबतची माहिती देणारं वृत्त 'फायनान्शिअल एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलं आहे. बजेट तयार करा पैशांची बचत करण्यासाठी बजेट (Budget) तयार केलं पाहिजे. तुम्हाला एकूण उत्पन्नापैकी किती पैसे खर्च करायचे आहेत आणि किती बचत करायची आहे ही गोष्ट ठरवणं बजेटमुळं सोपं होतं. अत्यावश्यक गोष्टींवरच्या खर्चाव्यतिरिक्त, तुम्ही मनोरंजनासाठी होणाऱ्या खर्चाचंही बजेट तयार करू शकता. Health Insurance घेताना 'या' गोष्टी तपासून घ्या, अन्यथा गरजेच्या वेळी होईल मनस्ताप इन्कमनुसार खर्च ठरवा 'अंथरूण पाहून पाय पसरावेत', अशी म्हण घरातल्या ज्येष्ठ सदस्यांकडून तुम्ही कधी तरी नक्की ऐकलं असेल. आपल्या कुवतीनुसार एखादी गोष्ट करावी, असा या म्हणीचा अर्थ होतो. पैशांच्या बचतीमध्येदेखील हा नियम लागू होतो. आपल्या कमाईनुसार (Earnings) खर्च (Expenses) केला पाहिजे. जेव्हा तुमचं इन्कम (Income) वाढेल तशी तुम्ही खर्चामध्ये वाढ करू शकता; मात्र इन्कम कमी असताना भरमसाठ खर्च केल्यास बचत करता येणार नाही. याशिवाय, इन्कम वाढल्यानंतर बचतीच्या रकमेतही वाढ करा. खर्च करण्यापूर्वी करा बचतीचा विचार दिग्गज गुंतवणूकदार (Investor) वॉरन बफे (Warren Buffett) यांनी म्हटलं आहे, की 'खर्च करून जी रक्कम शिल्लक राहते तिला बचत म्हणू नका, बचत केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहील ती खर्च करा.' सहसा आपण बचतीचा अगोदर विचार करत नाही. अगोदर खर्चाला प्राधान्य दिलं जातं. अशा वेळी आपल्याकडून जास्त प्रमाणात पैसे खर्च होतात. त्यामुळे अगोदर कमाईतली काही ठरावीक रक्कम बचत म्हणून बाजूला ठेवणं महत्त्वाचं आहे. बचतीची रक्कम (Saving Amount) सेट न करता खर्च करत राहिल्यास कदाचित सर्व कमाईही खर्च होऊन जाऊ शकते. mAadhaar App: कुटुंबातील सर्वांचं आधार कार्ड प्रोफाईल एकाच ठिकाणी करा सेव्ह; चेक करा संपूर्ण प्रोसेस शॉपिंगच्या अगोदर यादी तयार करा शॉपिंगला गेल्यानंतर बहुतेकदा अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होतो. हा खर्च टाळण्यासाठी शॉपिंगला जाण्यापूर्वी आवश्यक असलेल्या गोष्टींची यादी (Shopping List) तयार करा. तुम्ही यादी तयार केली नाही, तर अनेकदा गरजेच्या वस्तूंची खरेदी राहते आणि त्याऐवजी अनावश्यक वस्तूंची खरेदी होते. असं झाल्यास शॉपिंगचा खर्च वाढण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच खरेदी करण्यापूर्वी एक यादी तयार करणं महत्वाचं आहे. पैशांच्या व्यवहारामध्ये पार्टनरला सहभागी करा पैशांशी संबंधित बाबींमध्ये पार्टनरलाही (Partner) सहभागी करून घेतलं पाहिजे. बचतीसाठी अगोदर काही रक्कम बाजूला ठेवल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पैशांमध्ये सर्व खर्च मॅनेज करावा लागतो. अशा वेळी कुठे किती पैसे खर्च करायचे आहेत याच्या नियोजनामध्ये पार्टनरची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. वरील लहान-मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे पैशांची बचत करू शकता.
    First published:

    Tags: Investment, Money, Savings and investments

    पुढील बातम्या