Home /News /money /

Gold Price Today: सोने दरात वाढ; पाहा काय आहे 10 ग्रॅमसाठीचा गोल्ड रेट

Gold Price Today: सोने दरात वाढ; पाहा काय आहे 10 ग्रॅमसाठीचा गोल्ड रेट

आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याचा दर आज काहीसा तेजीत आहे. तर चांदीच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळाली.

  नवी दिल्ली, 26 एप्रिल: आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याचा दर आज काहीसा तेजीत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा जूनमधील फ्यूचर ट्रेड 46.00 रुपयांच्या वाढीसह 47,578.00 रुपये आहे. तर चांदीच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळाली. चांदीचा मेमधील फ्यूचर ट्रेड 51.00 रुपयांच्या घसरणीसह 68,623.00 रुपयांवर आहे. CapitalVia Global रिसर्चनुसार, MCX गोल्डमध्ये 47200-47250 पर्यंत सपोर्ट लेवल पाहायला मिळू शकतो. सोनं जर 48400 लेवलवर पोहचलं, तर पुढे हा रेट 49,700 रुपयांपर्यंत पोहचू शकतो. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. अमेरिकेत सोन्याचा व्यापार 2.90 डॉलरच्या घसरणीसह 1,781.13 डॉलर प्रति औंस इतका आहे. चांदीचा दरही 0.11 डॉलरच्या घसरणीसह 26.02 डॉलर इतका आहे. 24 कॅरेट गोल्ड रेट - दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमसाठीचा भाव 50450 रुपये इतका आहे. तर चेन्नईत 24 कॅरेट सोन्याचा, एक तोळ्याचा दर 48820 रुपये, मुंबईत 45930 रुपये आणि कोलकातामध्ये 49690 रुपये इतका आहे. 22 कॅरेट गोल्ड - 22 कॅरेट गोल्डचा दिल्लीतील भाव 46230 रुपये आहे. चैन्नईत 10 ग्रॅमचा रेट 44750 रुपये आहे. मुंबईत 44930 रुपये आणि कोलकातामध्ये 47420 रुपये आहे.

  (वाचा - मुंबईच्या 77 वर्षाच्या आजीनं सुरू केला व्यवसाय, महिन्याला कमवतायेत 3 लाख)

  सोन्याची शुद्धता कशी तपासाल? सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App लाँच करण्यात आलं आहे. 'BIS Care app' वर ग्राहक सोन्याच्या शुद्धतेची पडताळणी करू शकतात. या App द्वारे केवळ सोन्याची शुद्धताचं नाही, तर याबाबत कोणतीही तक्रारही करू शकतात. वस्तूचं लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास, ग्राहक यांची तक्रार करू शकतात. तक्रार दाखल केल्यानंतर ग्राहकांना याबाबत त्वरित माहितीही मिळेल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Gold, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Money

  पुढील बातम्या