खूशखबर! सरकार इनकम टॅक्समध्ये मोठी सवलत देण्याची शक्यता

अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकारने कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केली. आता सरकार इनकम टॅक्समध्येही मोठी सवलत देण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 05:45 PM IST

खूशखबर! सरकार इनकम टॅक्समध्ये मोठी सवलत देण्याची शक्यता

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकारने कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केली. आता सरकार इनकम टॅक्समध्येही मोठी सवलत देण्याची शक्यता आहे. याबद्दल अर्थमंत्रालयाच्या बैठका सुरू आहेत. महसूल मंत्रालयाच्या कक्षेत येणाऱ्या प्रत्यक्ष कर विभागात इनकम टॅक्सबद्दल धोरण ठरवलं जातं. या विभागामध्ये इनकम टॅक्स कमी करण्यावर विचार सुरू आहे.

प्रत्यक्ष करामध्ये बदल करण्यासाठी नेमलेल्या कृती दलाने मागच्या महिन्यात त्यांचा अहवाल दिला होता. त्यावरून हे बदल केले जाणार आहेत.

इनकम टॅक्समधून दिलासा मिळाला तर लोकांच्या खिशात जादा पैसे राहतील आणि त्यांची क्रयशक्ती वाढेल. मागणी आणि पुरवठ्याचं गणित जमलं तर अर्थव्यवस्थेलाही दिलासा मिळू शकेल हा यामागचा उद्देश आहे.

5 लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर कर होणार कमी

- 5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर लागणार नाही, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.

Loading...

- सध्या अडीच लाख रुपये ते 5 लाख रुपये उत्पन्नावर कर आकारला जातो.

- 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के टॅक्स आकारला जावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.

(हेही वाचा : मोदी सरकारने लाँच केली बांबूची बाटली, शेणाचा साबण आणि शाम्पूही!)

- 10 लाख ते 20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के कर लावावा, असं या टास्क फोर्सने म्हटलं आहे.

- 20 लाख ते 2 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर 30 टक्के कर लावावा, अशीही शिफारस करण्यात आली आहे.

- 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असेल तर 35 टक्के कर लावण्यात यावा, असं या टास्क फोर्सने म्हटलं आहे.

सरकारी खजिन्याची स्थिती लक्षात घेऊन या कररचनेबद्दल निर्णय घेतला जाईल. लवकरच इनकम टॅक्समध्येही दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे.

====================================================================================

सातारकर यंदा कमिटमेंट पाळणार? उदयनराजे म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 05:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...