मुंबई, 17 जानेवारी : आयकर (Income Tax) जमा करताना आपण बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतो, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), विमा पॉलिसी, गृहकर्ज आणि भाडे यासारख्या बाबींच्या आधारे सूट (Tax Exemption) मिळवू शकतो. करात सूट मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही कर वाचवू शकता तसेच तुमची बचत आणि गुंतवणूक वाढवू शकता.
याशिवाय, काही अप्रत्यक्ष मार्ग देखील आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही कर वाचवू शकता. यामध्ये पालकांच्या नावावर काही विमा योजना किंवा बचत योजनांमध्ये गुंतवणूक (Investments) करता येते. येथे आपण कर वाचवण्याच्या अशा तीन मार्गांची चर्चा करत आहोत. या बचत पद्धती अशा लोकांसाठी उपयुक्त आहेत ज्यांचे पालक कराच्या कक्षे बाहेर आहेत किंवा त्यांचे उत्पन्न करपात्र उत्पन्नापेक्षा कमी आहे.
पालकांना भेट द्या
तुम्ही तुमचे करपात्र उत्पन्न तुमच्या पालकांना भेट देऊ शकता आणि त्यांच्या नावावर गुंतवणूक करू शकता. ज्येष्ठ नागरिकांसाठी मूळ कर सवलत मर्यादा 3 लाख रुपये आहे, तर 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे नागरिक 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कराच्या जाळ्यातून बाहेर येतात.
Credit Card Tips: क्रेडिट कार्ड वापरुन 'ही' कामं करताय का? आर्थिक संकटात अडकण्यापासून स्वत:ला वाचवा
तसेच, बँक किंवा पोस्ट ऑफिस डिपॉझिटवर मिळवलेले 50,000 रुपयांपर्यंतचे व्याज ज्येष्ठ नागरिकांसाठी करातून मुक्त आहे. तुमच्या पालकांचे उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त असले तरीही तुम्ही त्यांच्या नावावर त्यांच्या कर स्लॅबनुसार गुंतवणूक करून कर सूट मिळवू शकता. पालकांना त्यांच्या मुलाकडून मिळालेली रोख भेट करमुक्त आहे आणि अशा गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न करपात्र उत्पन्नात जोडले जाणार नाही.
पालकांसाठी आरोग्य विमा
तुमच्या पालकांकडे कोणत्याही प्रकारचा आरोग्य विमा नसेल तर तुम्ही त्यांच्यासाठी आरोग्य पॉलिसी घेऊ शकता. प्राप्तिकराच्या कलम 80D अंतर्गत, पालकांचे वय 60 वर्षांच्या आत असल्यास आरोग्य विम्यावर 25,000 रुपयांच्या कपातीचा दावा केला जाऊ शकतो. जर पालकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर कर सूट मर्यादा 50,000 रुपये आहे. विशेष बाब म्हणजे करातील ही सूट कलम 80D अंतर्गत 25,000 रुपयांच्या मर्यादेपेक्षा वेगळी आहे. तुम्ही कलम 80D अंतर्गत तुमच्या स्वतःच्या कुटुंबासाठी आरोग्य विम्यावर कर सूट मिळवू शकता.
पालकांना भाडे देऊन
तुम्ही पगारदार कर्मचारी असाल तर तुम्ही तुमच्या पालकांना भाडे देऊन कर वाचवू शकता. लक्षात ठेवा की मालमत्ता पालकांच्या नावावर असावी.
Online Fraud : तुमच्या बँक अकाऊंटमधून बेकायदेशीररित्या पैसे गायब झाल्यास काय कराल?
अपंग पालकांच्या सेवेत कर सूट
अपंग पालकांवर झालेल्या खर्चावर तुम्ही आयकराचा दावा करू शकता. आयकराच्या कलम 80DD अंतर्गत, जर एखाद्याचे पालक अपंग असतील तर ती व्यक्ती आयकरात सूट घेऊ शकते. 40 टक्के अपंग पालकांना 75 हजार रुपयांपर्यंतच्या खर्चावर करमाफीचा लाभ मिळतो. जर कुटुंबात दोन भाऊ असतील, दोघेही आपल्या आई-वडिलांवर खर्च करत असतील, तर त्यांचा खर्च किती आहे, हे पाहिले जाईल. जर दोन्ही भावांनी 75-75 हजार रुपये खर्च केले, तर दोन्ही भाऊ आयकरावर सुट मिळवण्याचा दावा करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.