Income Tax Return : ITR भरण्यापूर्वी या महत्त्वाच्या तारखा तपासा

Income Tax Return : ITR भरण्यापूर्वी या महत्त्वाच्या तारखा तपासा

दरवर्षी करदात्यांना आयटीआर (ITR) भरणं बंधनकारक आहे. कोरोना (Corona Virus) मुळे देशभरातील परिस्थिती लक्षात घेता आयकर विभागाने गेल्या महिन्यातच आयटीआर भरण्याची मुदत वाढवली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : दरवर्षी करदात्यांना आयटीआर (ITR) भरणं बंधनकारक आहे. आयटीआर हा एक प्रकारचा फॉर्म आहे ज्यात एखाद्या व्यक्तीला लागू होणाऱ्या करानुसार तो त्याच्या उत्पन्नाची माहिती देतो. हा फॉर्म आपल्या टॅक्ससहित आयकर विभागाला पाठवायचा असतो. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2020 ही आहे. कोरोना (Corona Virus) मुळे देशभरातील परिस्थिती लक्षात घेता आयकर विभागाने गेल्या महिन्यातच ही मुदत वाढवली आहे.

2019-20 या आर्थिक वर्षासाठी कर भरणाऱ्यांच्या 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत झालेल्या कमाईची नोंद या रिटर्नमध्ये करण्यात येणार आहे. आयटीआर भरण्याची तारीख 31 जुलै च्या आसपास असते, पण या वेळी covid-19 च्या साथीने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ही तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

आयटीआर भरण्याससंबंधी काही महत्त्वपूर्ण तारखा

-ज्या करदात्यांना ऑडिट करणे आवश्यक आहे, त्यांची आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

-आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत व्यवहाराच्या संदर्भात अहवाल सादर करण्यासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

-तसेच इतर करदात्यांसाठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.

-आंतरराष्ट्रीय देशांतर्गत व्यवहारासंदर्भात ऑडिट रिपोर्ट देण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.

-तसेच करदात्याची स्वतःची करआकारणी लाएबलिटी एक लाख रुपयांपर्यंतची आहे, अशा करदात्यांना ही मुदत 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. लहान आणि मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. पूर्वी ऑडिट करून ऑडिट व्यतिरिक्त कर भरणाऱ्यांसाठी 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असायची. परंतु आता त्या तारखेमध्ये सुद्धा मुदत वाढ करण्यात आली आहे.

आयकर विभागाच्या वेबसाईट वर याबाबतची अधिक माहिती तुम्हाला मिळू शकेल. तसेच त्यांच्या वेबसाईटवर आयटीआर ऑनलाईन सुद्धा भरता येऊ शकतो. आयटीआर भरण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म 16 तसेच गुंतवणुकीची माहिती आणि इतर कागदपत्रांची आवश्यकता आहे.

Published by: Shreyas
First published: November 21, 2020, 11:19 AM IST
Tags:

ताज्या बातम्या