इन्कम टॅक्स रिटर्न तुमचा तुम्ही भरताय? मग जाणून घ्या तुमच्यासाठी योग्य फॉर्म कोणता आहे

ज्याचं वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत आहे, असा कोणीही वैयक्तिक करदाता (Individual Taxpayer) ITR-1 हा फॉर्म भरू शकतो.

ज्याचं वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत आहे, असा कोणीही वैयक्तिक करदाता (Individual Taxpayer) ITR-1 हा फॉर्म भरू शकतो.

  • Share this:
    मुंबई, 18 डिसेंबर : 2019-2020 या आर्थिक वर्षासाठीचा (Fiscal Year) इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) तुम्ही अजून भरला नसेल, तर आता घाई करा. कारण त्यासाठीची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2020पर्यंतच आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे (Coronavirus Pandemic) या वर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत अनेकदा वाढवण्यात आली होती. इन्कम टॅक्स रिटर्न तुमचा तुम्हीच भरण्याच्या तयारीत असाल, तर त्यासाठी सर्वांत महत्त्वाचं आहे ते म्हणजे योग्य ITR फॉर्मची (ITR Form) निवड. तुम्ही योग्य फॉर्मची निवड केली नाहीत, तर इन्कम टॅक्स रिटर्न भरूनही तुम्हाला नोटीस येऊ शकते. ITR-1 ज्याचं वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत आहे, असा कोणीही वैयक्तिक करदाता (Individual Taxpayer) ITR-1 हा फॉर्म भरू शकतो. नोकरीतून मिळणारा पगार (Salary), पेन्शन (Pension), एका घरापासून मिळणारं उत्पन्न यांपैकी कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळणाऱ्या व्यक्तीसाठी ITR-1 हा फॉर्म भरणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांचं शेतीतून मिळणारं उत्पन्न 5000 रुपयांपर्यंत आहे, तेदेखील हा फॉर्म भरू शकतात. ज्यांच्या दोन प्रॉपर्टीज आहेत, अशा व्यक्तीही अनेकदा हाच फॉर्म भरतात; मात्र ते चुकीचं आहे. ज्यांच्याकडे दोन प्रॉपर्टीज आहेत, त्यांनी ITR-2 हा फॉर्म भरला पाहिजे. ITR-2 ज्यांचं वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, ज्यांच्याकडे एकाहून अधिक प्रॉपर्टीज (Properties) आहेत, भांडवली गुंतवणुकीतून मिळणारं उत्पन्न (Capital Gains) आहे किंवा आणखी कोणत्या स्रोतातून मिळणारं उत्पन्न असेल, तर अशी व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाने (HUF) ITR-2 हा फॉर्म भरणं आवश्यक आहे. एखाद्या कंपनीचा डायरेक्टर (संचालक) असलेल्या व्यक्तीलाही हाच फॉर्म भरावा लागतो. ITR-3 एखादी व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाला बिझनेस (Business), प्रोफेशन (Profession) किंवा कोणत्या कंपनीसोबत भागीदारी (Partnership) केल्यामुळे उत्पन्न मिळालं, असेल, तर त्यांनी ITR-3 फॉर्म भरणं आवश्यक आहे. ITR-4 प्रीझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम (PTS) हा पर्याय ज्यांनी निवडला असेल, त्यांना ITR-4 हा फॉर्म भरावा लागतो. PTS स्कीममध्ये अनुमानित उत्पन्न किंवा नफ्याच्या आधारावर टॅक्स आकारला जातो. कोणी व्यक्ती किंवा एखाद्या कंपनीचा डायरेक्टर (Director) असेल, अनलिस्टेड इक्विटी शेअरमध्ये (Unlisted Equity Share) गुंतवणूक केली असेल किंवा हाउस प्रॉपर्टी इन्कमअंतर्गत (House Property Income) कॅरी फॉरवर्ड लॉस (Carry Forward Loss) असेल, तर हा फॉर्म भरता येत नाही. ITR-5 पार्टनरशिप फर्म्स आणि लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप्ससाठी (LLP) या टॅक्स फॉर्मचा वापर केला जातो. ITR-6 ज्या कंपन्यांना इन्कम टॅक्स कायदा 1961च्या सेक्शन 11 अंतर्गत ज्या कंपन्यांना सूट मिळालेली नाही, अशा कंपन्यांनासाठी खास हा फॉर्म आहे. ITR-7 या फॉर्मचा वापर बिझनेस ट्रस्टकडून केला जातो. इन्कम टॅक्सशी संबंधित कोणत्याही कटकटीपासून मुक्तता मिळवायची असेल, तर सर्वांत आधी योग्य फॉर्मची निवड करा आणि त्यानंतर योग्य कागदपत्रांसह तो फॉर्म भरा.
    First published: