मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Income Tax Return: जर 4 दिवसात पूर्ण नाही केलं हे काम तर भरावा लागेल भरभक्कम दंड, वाचा सविस्तर

Income Tax Return: जर 4 दिवसात पूर्ण नाही केलं हे काम तर भरावा लागेल भरभक्कम दंड, वाचा सविस्तर

आयकर विवरणपत्र (Income Tax Return) दाखल करण्याची शेवटची तारीख (Income Tax Return last date) 31 डिसेंबर आहे. त्यामुळे या तारखेपूर्वी हे काम पूर्ण करणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 28 डिसेंबर: आयकर विवरणपत्र (Income Tax Return) दाखल करण्याची शेवटची तारीख (Income Tax Return last date) 31 डिसेंबर आहे. त्यामुळे या तारखेपूर्वी हे काम पूर्ण करणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत आयटीआर दाखल केला नाही तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही माहिती करून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही वर्षअखेर आयटीआर भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

दंड किती भरावा लागेल माहित करुन घेण्यापूर्वी हे जाणून घेणे आवश्यक आहे की सरकारने यावेळी कोरोनासह उद्भवलेल्या इतर समस्यांमुळे नेहमी असणारी आयटीआर भरण्याची तारीख 31 जुलैवरुन 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. 26 डिसेंबर रोजी समोर आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 4.51 कोटीपेक्षा जास्त करदात्यांनी रिटर्न भरला आहे. केवळ 26 डिसेंबर रोजीच 8.7 लाख जणांनी आयटीआर भरला आहे.

हे वाचा-कपड्यांसह आता चप्पल-सँडल खरेदी करणं महागणार, नवीन वर्षात ग्राहकांना झटका!

वरील आकडेवारी जाहीर करताना आयकर विभागाने उर्वरित लोकांना लवकरात लवकर आयटीआर भरण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही वेळेनंतर आयटीआर भरलात तर दंड भरावा लागेल, हे टाळण्यासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत आयटीआर दाखल केलात तर फायद्यात राहाल.

किती भरावा लागेल दंड?

आयकर रिटर्न भरण्याची डेडलाइन 31 डिसेंबर 2021 नंतर जर तुम्ही 2021-22 अॅसेसमेंट ईयरसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरला तर तुम्हाला 5000 रुपये पेनल्टी द्यावी लागेल. इन्कम टॅक्स कायदा सेक्शन 234F मध्ये याबाबत नमुद करण्यात आले आहे. जर 31 मार्च 2022 नंतरही तुम्हाला 2021-22 अॅसेसमेंट ईयरसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरता येईल, पण तुम्हाला 10000 रुपये दंड भरावा लागेल.

हे वाचा-महाराष्ट्रात काय आहेत इंधनाचे दर, एका क्लिकवर वाचा पेट्रोल-डिझेलचा लेटेस्ट भाव

या लोकांना नाही द्यावा लागणार दंड

ज्यांचे एकूण उत्पन्न मूळ सवलतीच्या मर्यादेपेक्षा जास्त नाही, त्यांना ITR भरण्यास उशीर झाल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही. एकूण उत्पन्न (Gross Total Income) सवलतीच्या मूळ मर्यादेपेक्षा कमी असेल, तर रिटर्न उशीरा भरल्याबद्दल कलम 234F अंतर्गत कोणताही दंड लागणार नाही.

First published:

Tags: Income tax