ITR मध्ये 'या' मिळकतीची उल्लेख करायलाच हवा, नाही तर भरावा लागेल मोठा दंड

ITR मध्ये 'या' मिळकतीची उल्लेख करायलाच हवा, नाही तर भरावा लागेल मोठा दंड

Income Tax - ITR भरताना या महत्त्वाच्या गोष्टी विसरू नका

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आता 31 ऑगस्ट 2019 आहे. या महिन्यात ITR भरण्याची घाई करावी लागेल. पण त्या घाईत काही गोष्टी तुम्ही रिटर्नमध्ये दाखवल्या नाहीत तर नक्की अडचणीत याल. टाकू या त्यावर एक नजर-

बदललेल्या म्युच्युअल फंडाची माहिती

हल्ली अनेक जण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असतात. एका म्युच्युअल फंडातून दुसरीकडे जाताना  म्युच्युअल फंडातून जे पैसे मिळतात ते दाखवायचं अनेकदा राहून जातं. ते दाखवणं आवश्यक आहे.

पदवीधरांना मुंबई हाय कोर्टात नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

सेव्हिंग अकाउंट आणि एफडीमधून मिळणारं व्याज

ITR फाइल करताना सेव्हिंग अकाउंट आणि एफडीमधून मिळणारं व्याजही दाखवावं लागतं. त्याचाही हिशेब द्यावा लागतो.

छोट्या मुलांच्या नावे केलेली गुंतवणूक

तुम्ही तुमच्या छोट्यांच्या नावे केलेली गुंतवणूक एका वर्षात 1500 रुपयांपर्यंत करमुक्त आहे. पण ती या रकमेच्या पुढे जात असेल तर मग ITR मध्ये दाखवावी लागेल.

पोस्ट ऑफिस सुरू करतेय 'ही' नवी सुविधा, घरबसल्या मिळतील फायदे

एका घरापेक्षा जास्त घरातून मिळणारं उत्पन्न

आयकर विभागाच्या नियमानुसार तुम्ही तुमच्या मालकीचं एक घर ठेवू शकता. ते करमुक्त असतं. पण तुम्हाला तुमच्या दुसऱ्या एखाद्या घरातून उत्पन्न मिळत असेल तर ते करमुक्त असेल.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं कर भरणाऱ्यासाठी खास सुविधा सुरू केलीय. करदाते आता ई फायलिंगद्वारे रिटर्न फाइल करू शकतात. ही एक नवी सुविधा सुरू झालीय. https://www.incometaxindiaefiling.gov.in या पोर्टलवर ही सेवा आहे. याला ई फायलिंग लाइट असं नाव दिलंय.

ई फायलिंग लाइट या नव्या सेवेचा वापर

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं सांगितलं की, करदात्यांसाठी ई फायलिंग लाइट सुरू करतंय. तुम्ही होम पेजवर जाऊन ई फायलिंग लाइट बटण दाबून याचा वापर करू शकता. सर्व सेवांबरोबर ई फायलिंग पोर्टलला पोर्टल लाॅगइन बटन दाबून वापरता येईल.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की वेब पोर्टलवर 'लाइट' टॅब दिलाय. करदात्यांनी एकदा आपल्या पेजवर ऑनलाइन आयकर रिटर्न आणि 26एएस भरणं आवश्यक आहे.

SBI Alert : तुमच्या बँक अकाउंटमधून अशी होऊ शकते चोरी!

आधीचा भरलेला ITR पाहता येतो

करदाता पहिल्यांदा भरलेला रिटर्न किंवा एक्सएमएल फाॅर्म डाउनलोड करू शकतात. पहिल्यांदा भरलेला रिटर्न पाहू  शकतात.

ITR भरल्यानंतर युजर्सनी तो व्हेरिफाय करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही फाॅर्म व्हेरिफाय केला नाही, तर इन्कम टॅक्स नियमांप्रमाणे तो वैध मानला जात नाही. व्हेरिफाय करण्यासाठी OTP येतो. त्यासाठी तुमचा फोन नंबर आधार कार्डाशी जोडला असला पाहिजे. OTP इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर टाकला की तुमचा रिटर्न व्हेरिफाय होईल. याशिवाय तुम्ही बँक एटीएम, बँक अकाउंट, डिमॅट अकाउंट आणि नेट बँकिंगद्वारे तुम्ही ITR व्हेरिफाय करू शकता.

VIDEO : ... आणि धुवांधार पावसात जीव धोक्यात घालून प्रवासी ट्रॅकवरून धावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Income tax
First Published: Aug 3, 2019 08:23 PM IST

ताज्या बातम्या