नवी दिल्ली, 23 जानेवारी : नव्या वर्षातले पहिले 3 महिने नोकरी करणाऱ्यांसाठी ताणाचे असतात. दर महिन्याच्या खर्चासोबतच कर वाचवण्यासाठी सेव्हिंग करून वेगळे पैसे वाचवावे लागतात. त्यामुळे अगदी अखेरच्या क्षणी घाई करण्यापेक्षा वर्षभराचंच प्लॅनिंग करणं जास्त चांगलं असतं.
1. लाइफ इन्शुरन्स प्रिमियम, बँक एफडी, ट्यूशन फी, सुकन्या समृद्धी योजना (SSY), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ELSS, पेन्शन फंड्स अशा योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांवर कर लागत नाही. यासाठी दीड लाख (1.50)रुपयांची मर्यादा आहे.
2. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF
सरकारी योजना PPF हा एक चांगला पर्याय आहे. त्याचा मॅच्युरिटी पिरेड 15 वर्षांचा असतो. या अकाउंटवर मिळणारं व्याजही टॅक्स फ्री असतं.
3. नॅशनल पेन्शन स्कीम (NPS)
NPS खाती दोन प्रकारची असतात. NPS टायर - 1 अकाउंट प्रायमरी अकाउंट असतं. NPS टायर - 2 अकाउंट कोणत्याही लॉक इन पिरेडचं पर्यायी खातं असतं. यामध्ये गुंतवलल्या रकमेवरही कराची सवलत असते.
(हेही वाचा : म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणं होणार फायदेशीर, बजेटमध्ये या करात होणार बदल?)
4. हेल्थ इन्शुरन्स प्रिमियम
इनकम टॅक्सच्या सेक्शन 80 D नुसार मेडिकल इन्शुरन्ससाठी दिल्या जाणाऱ्या प्रिमियमवरचा टॅक्स वाचवू शकतो.
5. घरभाड्यावरही करसवलत
तुम्ही जर भाड्याच्या घरात राहात असाल तर तुम्हाला करात सवलत मिळू शकते. सेक्शन 80 GG नुसार जास्तीत जास्त सवलत 60 हजार रुपयांवर आहे.
6. देणगीवरही करसवलत
सेक्शन 80 G नुसार 2 हजार रुपयांपेक्षा जादा देणगी दिली तर करसवलत मिळू शकते. ही देणगी कॅश, डिमांड ड्राफ्ट, बँक ट्रान्सफर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या स्वरूपात हवी.
(हेही वाचा : PMC नंतर ही बँक बुडण्याचा धोका, खातेदारांचा जीव टांगणीला)
7. काही खास सेव्हिंगवर मिळते करसवलत
सेक्शन 80 TTA नुसार सेव्हिंग खात्यांवर मिळणाऱ्या व्याजावर सूट मिळते. बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा टाइम डिपॉझिटमधून मिळणाऱ्या व्याजावर या सेक्शननुसार सूट मिळणार नाही.
================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax, Money