• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Income Tax: ITR फाईल करण्यासाठी नव्या वेबसाईटवर रजिट्रेशन कसं कराल; वाचा सविस्तर

Income Tax: ITR फाईल करण्यासाठी नव्या वेबसाईटवर रजिट्रेशन कसं कराल; वाचा सविस्तर

Income Tax च्या नवीन वेबसाइटवर नोंदणी केल्याशिवाय तुम्ही ITR दाखल करू शकणार नाही. मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : जर तुम्हाला आयकर विभागाच्या (Income Tax Portal) नवीन वेबसाईटद्वारे आयटीआर (Income Tax Return) दाखल करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. काही स्टेप्स फॉलो करुन तुम्ही सहजपणे तुमची नोंदणी करू शकाल. नोंदणी केल्याशिवाय तुम्ही नवीन वेबसाइटवर ITR दाखल करू शकणार नाही. मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 आहे. त्यामुळे तुम्ही ITR दाखल करायचा असेल तर आधी नोंदणी करावी लागेल. कोणती कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत? 1. अॅक्टिव्ह पॅन कार्ड (PAN Card) 2. मोबाईल नंबर (Mobile Number) 3. वॅलिड ई-मेल आयडी (Valid email id) EPFO सदस्यांसाठी महत्त्वाचे! तुम्हाला माहित आहेत का PF चे हे सहा मोठे फायदे? नोंदणी करण्यासाठी काय कराल? >> सर्व प्रथम www.incometax.gov.in वेबसाईटवर जा. >> नवीन पोर्टलवर Register वर क्लिक करा. >> येथे Taxpayer वर क्लिक करा. others वर क्लिक करू नका. >> यानंतर तुमचा वैध आणि अॅक्टिव्ह पॅन नंबर एन्टर करा आणि Validate वर क्लिक करा. >> तुमचे पॅन कार्ड इनअॅक्टिव्ह असेल तर Error येईल. >> सर्वकाही बरोबर असल्यास, खात्री करण्यासाठी Individual Taxpayers वर क्लिक करा. >> पॅन व्हॅलिडेटेड झाल्यावर Continue वर क्लिक करा. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणुकीचे पर्याय,5 वर्षांत मिळाला तब्बल 251% परतावा >> यानंतर, आपले डिटेल्स जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता काळजीपूर्वक लिहा आणि Continue वर क्लिक करा. >> त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर, ई-मेल यासारखी आवश्यक माहिती अपडेट करावी लागेल. >> वरील प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या मोबाइल क्रमांकावर आणि ई-मेलवर ओटीपी पाठवला जाईल. ते फक्त 15 मिनिटांसाठी अॅक्टिव्ह असेल. OTP काळजीपूर्वक भरल्यानंतर Continue वर क्लिक करा. >> सर्व माहितीची पडताळणी करावी लागेल. सर्व माहिती तपासा आणि नंतर Confirm वर क्लिक करा. >> त्यानंतर तुमचा पासवर्ड टाइप करा. लक्षात ठेवा की पासवर्ड किमान 8 शब्द आणि जास्तीत जास्त 14 अल्फाबेट असणे आवश्यक आहे. नेहमी पासवर्ड स्ट्राँग बनवा जेणेकरून कोणीही आपले लॉगिन अनलॉक करू शकणार नाही. >> या व्यतिरिक्त, आपल्याला प्रत्येक वेळी 25 शब्दांचा Personalised मेसेज एन्टर करावा लागेल. >> मेसेज लिहिल्यानंतर, तुम्ही Register वर क्लिक करताच तुम्हाला आयकर विभागाच्या नवीन वेबसाइटवर नोंदणी होईल.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: