Home /News /money /

कर कधी आणि कसा भरायचा? इन्कम टॅक्स विभागाचं ई-कॅलेंडर पाहा

कर कधी आणि कसा भरायचा? इन्कम टॅक्स विभागाचं ई-कॅलेंडर पाहा

इन्कमटॅक्स अर्थात प्राप्तिकर विभागानं (Income tax Department)नुकतच 2021 वर्षाचं नवं ई- कॅलेंडर (E-Calendar) प्रसिद्ध केलं आहे. या नव्या कॅलेंडरमुळे प्राप्तिकर विवरणपत्र (Income tax Return) भरणंही सोपं होईल.

    मुंबई, 05 जानेवारी: इन्कमटॅक्स अर्थात प्राप्तिकर विभागानं (Income tax Department)नुकतच 2021 वर्षाचं नवं ई- कॅलेंडर (E-Calendar) प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये करासंबंधी (Tax) सर्व माहिती देण्यात आली आहे. आता करप्रणाली मानवी हस्तक्षेपारहित आणि पेपरलेस होत असून, नव्या युगात तुमचं स्वागत आहे, असं या कॅलेंडरमध्ये म्हटलं आहे. आता करदात्यांना (Taxpayers) करसंबंधी सर्व तारखा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमची करासंदर्भातील कामं लक्षात ठेवणं सोपं जाईल. या नव्या कॅलेंडरमुळे प्राप्तिकर विवरणपत्र (Income tax Return) भरणंही सोपं होईल. जानेवारी 2021 : 10 जानेवारी : अ‍ॅसेसमेंट इयर 2020 -2021 साठी विना लेखा परीक्षण इन्कमटॅक्स विवरणपत्र भरण्यासाठी मुदत 10 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. 15 जानेवारी :  इन्कमटॅक्स अ‍ॅक्टनुसार विविध लेखा परीक्षण अहवाल सादर करण्याची तारीख. 15 जानेवारी :  31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी टीसीएस डीपॉझिटचे क्वार्टरली स्टेटमेंट 30 जानेवारी : 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एकत्रित करासंबंधी क्वार्टरली टीसीएस सर्टिफिकेट 31 जानेवारी : विवाद ते विश्वास योजनेअंतर्गत डिक्लेरेशन देण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी : 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी टीडीएस डीपॉझिटचे तिमाही विवरण फेब्रुवारी 2021 : 15 फेब्रुवारी : अ‍ॅसेसमेंट इयर 2020 -2021 साठी लेखा परीक्षण केलेल्या इन्कमटॅक्सचं विवरणपत्र भरण्यासाठी मुदत वाढविण्यात आलेली तारीख. 15 फेब्रुवारी : 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या टीडीएसचे तिमाही सर्टिफिकेट. मार्च 2021 : 15 मार्च : अ‍ॅसेसमेंट इयर 2020 -2021 साठी अग्रीम (अॅडव्हान्स) कराचा (Advance Tax) चौथा हप्ता. 31 मार्च : अ‍ॅसेसमेंट इयर 2020 -2021 साठी उशीरा किंवा सुधारीत विवरण पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 मार्च : आर्थिक वर्ष 2020-2021 साठी पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीसाठी जमा करण्यात आलेल्या टीडीएस किंवा टीसीएसचे तिमाही विवरण 31 मार्च : अतिरिक्त लेव्हीनंतर विवाद ते विश्वास योजनेशिवाय कर भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च : आधार कार्डला पॅनकार्ड जोडण्याची अंतिम तारीख मे 2021 : 15 मे : 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी टीसीएस स्टेटमेंट जमा करण्याची अंतिम तारीख 31 मे : 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी टीडीएस स्टेटमेंट जमा करण्याची अंतिम तारीख 31 मे : आर्थिक वर्ष 2020-21 साठी 285BA अंतर्गत आर्थिक देवाण-घेवाण विवरणपत्र सादर करण्याची तारीख जून 2021 : 15 जून : अ‍ॅसेसमेंट इयर 2022 -2023 साठी अग्रीम (अॅडव्हान्स) कराचा पहिला हप्ता. 15 जून : अ‍ॅसेसमेंट इयर 2021-2022 साठी कर्मचाऱ्यांना टीडीएस सर्टिफिकेट -फॉर्म 16 (दिलेल्या वेतनासंबंधी) 15 जून : 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी तिमाही टीडीएस सर्टिफिकेट (वेतनाशिवाय) जुलै 2021 : 15 जुलै : 30 जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी टीसीएस डीपॉझिटचे स्टेटमेंट 30 जुलै : 30 जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी टीसीएस सर्टिफिकेट 31 जुलै : 30 जून 2021 संपलेल्या तिमाहीसाठी टीडीएस डीपॉझिटचे स्टेटमेंट ऑगस्ट 2021 : 15 ऑगस्ट : 30 जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी टीडीएस सर्टिफिकेट (TDS Certificate) सप्टेंबर 2021 : 15 सप्टेंबर : अ‍ॅसेसमेंट इयर 2022-2023 साठी  अ‍ॅडव्हान्स कराचा दुसरा हप्ता 30 सप्टेंबर : अ‍ॅसेसमेंट इयर 2021-2022 साठी ज्यांच्या जमाखर्च खात्याचे लेखा परीक्षण जरूरी आहे कार्पोरेट आणि नॉन कार्पोरेटससाठी आयटीआर फाईल करण्याची तारीख ऑक्टोबर 2021 : 15 ऑक्टोबर : 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी टीसीएस डीपॉझिट स्टेटमेंट (TDS Deposit Statement) 30 ऑक्टोबर : 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी टीसीएस सर्टिफिकेट (TCS Certificate) 31 ऑक्टोबर : 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी टीडीएस डीपॉझिट स्टेटमेंट नोव्हेंबर 2021 : 15 नोव्हेंबर : 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी टीडीएस सर्टिफिकेट (वेतनाशिवाय) 30 नोव्हेंबर : अ‍ॅसेसमेंट इयर 2021-2022 साठी आयटीआर (इंटरनॅशनल ट्रँझॅक्शन किंवा स्पेसिफाईड डोमेस्टिक ट्रँझॅक्शन) डिसेंबर 2021 : अ‍ॅसेसमेंट इयर 2022-2023साठी अग्रीम (अ‍ॅडव्हान्स) कराचा तिसरा हप्ता.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Income tax, Money

    पुढील बातम्या