मराठी बातम्या /बातम्या /मनी /देशातील या विद्यापीठाला Income Tax देणार तब्बल 57 कोटी रुपये, कारण वाचून होईल आश्चर्य...

देशातील या विद्यापीठाला Income Tax देणार तब्बल 57 कोटी रुपये, कारण वाचून होईल आश्चर्य...

अवध विद्यापीठ

अवध विद्यापीठ

एका विद्यापीठाला आयकर विभाग 57 कोटी रुपये देणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ayodhya, India

सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी

अयोध्या, 24 मे : उत्तरप्रदेशातील अयोध्येतील डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठात एक प्रकरण समोर आले आहे, जे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. आयकर विभाग अवध विद्यापीठाला 57 कोटी रुपये परत करणार आहे. 2018 मध्ये प्राप्तिकर विभागाने विद्यापीठाच्या खात्यातून 45 कोटी 79 लाख 92 हजार रुपये कर म्हणून कापले गेले होते.

यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. प्रतिभा गोयल यांच्या प्रयत्नांमुळे आता व्याजासह 57 कोटी रुपये प्राप्तिकर विभाग अवध विद्यापीठाला परत करणार आहेत. 2013-14 मध्ये विद्यापीठाची अपील याचिका आयकर विभागाने फेटाळली होती.

26 जुलै 2022 रोजी या निर्णयाविरुद्ध अपील करण्यात आले, परिणामी 14 नोव्हेंबरला खटला लखनौला हस्तांतरित करण्यात आला, प्रभावी युक्तीवादचा परिणाम म्हणून 19 मे 2023 रोजी आकारलेला आयकर शून्य घोषित करण्यात आला आणि संपूर्ण रक्कम विद्यापीठाला परत करण्याचा आदेश पारित करण्यात आला.

विद्यापीठाचे वित्त अधिकारी पूर्णेंदू शुक्ला यांनी सांगितले की,  05 एप्रिल 2018 रोजी आयकर विभागाने एसबीआय खात्यातून 20 कोटी 3 लाख 92 हजार 562 रुपये आणि 11 एप्रिल 2018 रोजी एसबीआय खात्यातून 25 कोटी 76 लाख रुपये कर म्हणून घेतले. प्राप्तिकर अपीलीय न्यायाधिकरण, लखनौने संपूर्ण रक्कम व्याजासह विद्यापीठाला परत करण्याचा आदेश पारित केला आहे, जी सध्या प्रक्रियेसाठी CPC बेंगळुरूकडे पाठवली गेली आहे.

First published:
top videos

    Tags: Ayodhya, Education, Income tax, Local18