Home /News /money /

बापरे! फी म्हणून वकिलाने घेतले रोख 217 कोटी, आयकर विभागाची 38 ठिकाणी छापेमारी

बापरे! फी म्हणून वकिलाने घेतले रोख 217 कोटी, आयकर विभागाची 38 ठिकाणी छापेमारी

एका वकिलाने त्याच्या क्लायंटकडून जवळपास 217 कोटी रुपये रोख घेतल्याचे समोर आले आहे. आयकर विभागाने या चंदीगडमधील एका प्रसिद्ध वकिलावर कर चुकवल्याच्या आरोपावरून छापा टाकला आहे.

    नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : सेलिब्रिटी वकील किंवा Highest Paid वकील असे शब्द तुम्ही नेहमीच माध्यमातून ऐकले असतील. मोठमोठ्या सेलिब्रिटींसाठी किंवा देशातील बड्या व्यक्तींसाठी काम करणारे वकील त्यांच्या शुल्काच्या रुपात तगडी रक्कम घेतात. पण एखाद्या वकीलाने त्याच्या 217  कोटी रोख घेतल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? ही घटना घडली आहे चंदीगडमध्ये. याठिकाणी एका वकिलाने त्याच्या क्लायंट्सकडून जवळपास 217 कोटी रुपये रोख घेतल्याचे समोर आले आहे. आयकर विभागाने या चंदीगडमधील एका प्रसिद्ध वकिलावर कर चुकवल्याच्या आरोपावरून छापा टाकला आहे. मीडिया अहवालानुसार एका डिपार्टमेंटमधील एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने या वकिलाशी संबंधित 38 ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये हरयाणा, दिल्ली-एनसीआरमधील काही ठिकाणं आहेत. बुधवारी ही कारवाई करण्यात आली. कमर्शिअल अॅर्बिट्रेशन आणि विवाद निराकरणाच्या क्षेत्रात प्रॅक्टिस करणाऱ्या या वकिलाच्या विरोधात केलेल्या शोधात 5.5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती सीबीडीटीने एका निवेदनात दिली आहे. दरम्यान बोर्डाने वकिलाची ओळख पटवली नाही आहे. त्याचप्रमाणे या वकिलाशी संबंधित 10 लॉकर ताब्यात घेण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. The Tribune ने याबाबत वृत्त दिले आहे. (हे वाचा-मोठी बातमी! LPG सिलेंडरच्या होम डिलिव्हरीची प्रक्रिया 1 नोव्हेंबरपासून बदलणार) आयकर विभागाकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, 'क्लायंट्सचे वाद मिटवण्यासाठी त्याला भरभक्कम रक्कम मिळत असल्याचा संशय होता. करपात्र असणाऱ्या त्याच्याकडे बेहिशोबी व्यवहाराची आणि गेल्या अनेक वर्षात केलेल्या गुंकवणुकीची कागदपत्र सापडली आहेत.'  त्याचप्रमाणे या वकीलाने त्याा मिळालेल्या रोख रकमेबाबतची माहिती लपवल्याचा आरोप देखील सीबीडीटी बोर्डाकडून करण्यात आला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेस (CBDT)ने या वकिलावर असा आरोप केला आहे की, 'त्याला एका क्लायंटकडून 117 कोटी रुपये रोख मिळाले, पण त्याने रेकॉर्डमध्ये केवळ 21 कोटी चेकच्या माध्यमातून मिळाल्याचे नमूद केले आहे.' (हे वाचा-रिलायन्स JIO चा पोस्टपेड प्लस प्लॅन, 300 जीबी डेटासह मोफत मिळतील या सेवा) त्याचप्रमाणे सीबीडीटीने असा दावा केला आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीबरोबर लवादाच्या कारवाईसाठी त्याला एका इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंजिनिअरिंग कंपनीकडून 100 कोटी रुपये रोख मिळाले. त्याचप्रमाणे त्या वकिलाकडून ही रक्कम निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी गुंतवली आहे. त्याचप्रमाणे शाळांच्या ट्रस्टमध्ये देखील पैसे गुंतवले आहेत. समोर आलेल्या पुराव्यानुसार त्याने गेल्या 2 वर्षात अनेक ठिकाणी 100 कोटींहून अधिक रक्कम गुंतवली आहे. काही कोटी रक्कम असणाऱ्या अॅकॉमोडेशन एन्ट्री (Hawala Funds) त्याने घेतल्या आहेत. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार बोर्डाने असे म्हटले आहे की, शोधपथकाला त्याच्या आणि त्याला पैसे पुरवठा करणाऱ्या बिल्डर आणि फायनान्सर्समधील बेहिशोबी ट्रान्झॅक्शनचा डिजिटल डेटा देखील प्राप्त झाला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Income tax, Money

    पुढील बातम्या