सोशल अकाउंटवरून तुमच्या मिळकतीची माहिती घेतली जाते का?

सोशल अकाउंटवरून तुमच्या मिळकतीची माहिती घेतली जाते का?

Income Tax, Social Media - आयकर अधिकारी सोशल मीडियावर नजर ठेवतात, त्यातून तुमची मिळकत किती ते पाहतात, असं म्हटलं जातं. यात किती तथ्य आहे?

  • Share this:

मुंबई, 15 जुलै : काही दिवसांपूर्वी अशा बातम्या सुरू होत्या की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर नजर ठेवते.त्यातून तुमच्या मिळकतीची माहिती घेतंय. पण केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे ( CBDT ) अध्यक्ष पी. सी. मोदी यांनी हे चुकीचं असल्याचं सांगितलंय. ते म्हणाले आयकर अधिकारी तुमच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवतंय, तुम्ही परदेशी फिरायला गेलात किंवा महागडी खरेदी केलीत तर त्याचे फोटो चेक करतात, त्यावरून तुमची अघोषित मिळकत किती आहे, ते पाहतात,यात काही तथ्य नाही.

पी.सी.मोदी एका इंटरव्ह्यूत म्हणाले की, टॅक्स डिपार्टमेंटला अशा प्रकारे काही करण्याची गरज नाही. कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे असे देवाणीघेवाणीचे आकडे वेगवेगळ्या एजन्सीकडून येतात. आयकर विभागाकडे तशी व्यवस्था आहे.

सावधान, बँकेत चुकीचा आधार कार्ड नंबर दिलात तर पडेल 'इतका' दंड

यातूनच व्यक्तीच्या आर्थिक व्यवहाराची कल्पना आयकर विभागाला येते. पी.सी. मोदी यांना हा प्रश्न विचारला होता की, आयकर अधिकारी लोकांचे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अकाउंटवर नजर ठेवतात का? तेव्हा ते म्हणाले की तशी आयकर विभागाला गरजच काय?

15 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल लाखोंची कमाई

अशा अनेक बातम्या येत होत्या की लोकांचं राहणीमान अनेकदा सोशल मीडियावर दिसत असतंं. तुम्ही योग्य कर देताय की नाही हे पाहिलं जातं. पण यावर पी. सी. मोदी म्हणाले की, सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मची आम्हाला गरज काय? आमची व्यवस्था मजबूत आहे.

Amazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट!

सध्या जुलै महिन्यात इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असतो. Incom Taxमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून 5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याबाबतची घोषणा केली. मोदी सरकार Income Tax Slab कमी करून 3 लाखापर्यंत टॅक्स सूट देणार अशी चर्चा रंगली होती. पण, प्रत्यक्षात मात्र 5 लाख रूपयापर्यंत कर सूट देण्यात आली आहे.

पाच वर्षात वाढले करदाते

महत्त्वाची बाब म्हणजे 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या काळात करामध्ये मोठी वाढ झाली आहे. कारण, मागील 5 वर्षामध्ये 6.38 लाख कोटीवरून 11 लाख कोटीपर्यंत करात वाढ झाली आहे. मागील पाच वर्षामध्ये करामध्ये 78 टक्के वाढ झाली असल्याची माहिती देखील निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

सेल्फी घेण्याच्या नादात मरता-मरता वाचला युवक, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Income tax
First Published: Jul 15, 2019 03:03 PM IST

ताज्या बातम्या