नवी दिल्ली, 08 जानेवारी: असेसमेंट इयर 2020-21 साठी आतापर्यंत 5.16 कोटी रिटर्न फाइल (Income Tax Return) झाले आहेत. प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे केवळ 3 दिवस शिल्लक आहेत, लवकरात लवकर ITR भरण्याचे काम पूर्ण करा. 10 जानेवारी 2021 पर्यंत आयटीआर फाइल करण्याची तारीख आहे. यानंतर आयटीआर फाइल करण्यास गेल्यास तुम्हाला दुप्पट दंड द्यावा लागू शकतो. कोरोना पँडेमिकमुळे करदात्यांसाठी आयटीआर फाइल करण्याची तारीख 10 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्यावर्षी आयटी रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2019 होती.
आयकर विभागाने केलं ट्वीट
आयकर विभागाने आतापर्यंत फाइल करण्यात आलेल्या ITR बाबत ट्वीट केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, आतापर्यंत AY 2020-21 साठी 5.16 कोटीपेक्षा अधिक जणांनी आयटी रिटर्न 6 जानेवारी 2021 पर्यंत दाखल केला आहे. तुम्ही केला नसेल तर कृपया तुमचा ITR AY 2020-21 आजच दाखल करा.
Hope you have filed your Income Tax Return by now! More than 5.16 crore Income Tax Returns for AY 2020-21 have already been filed till 06th of January, 2021. If you haven't, please file your #ITR for AY 2020-21 TODAY! Visit https://t.co/EGL31K6szN for details.#ITR#AajHiFileKaro pic.twitter.com/KKqX28jOxZ
— Income Tax India (@IncomeTaxIndia) January 7, 2021
द्यावं लागेल उशिरा फाइल करण्याच शुल्क
जर तुम्ही वेळेत आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला विभागाकडून दंड आकारला जातो. जर करदात्यांनी 10 जानेवारी 2021 नंतर आयटीआर फाइल केला तर त्यांना 10,000 रुपये लेट फी द्यावी लागेल. शिवाय ज्या करदात्यांचे उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त नाही त्यांना लेट फी च्या स्वरुपात 1000 रुपये द्यावे लागतात.
या पद्धतीने देखील भरता येईल आयटीआर
1. इनकम टॅक्सच्या ई-फाइलिंग पोर्टलवर जाऊन युजर आयडी (PAN), पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.
2. 'e-File' मेन्यूवर क्लिक करा आणि त्यानंतर 'Income Tax Return' च्या लिंकवर क्लिक करा
3. इनकम टॅक्स रिटर्न पेज आपणहून भरलेलं दिसेल
(हे वाचा-अलर्ट! टोल फ्री क्रमांकासारख्या दिसणाऱ्या या नंबरवर कॉल करताय? RBI ने दिला इशारा)
4. आता असेसमेंट ईयर, आईटीआर फॉर्म नंबर, फाइलिंग टाइपमध्ये 'ओरिजिनल/ रिवाझ्ड रिटर्न' यापैकी पर्याय निवडा. यानंतर सबमिशन मोडमध्ये 'प्रीपेयर अँड सबमिट ऑनलाइन' वर क्लिक करा.
5. यानंतर 'Continue' वर क्लिक करा. याठिकाणी असणारी मार्गदर्शक तत्त्वे सावधानतेने वाचा आणि फॉर्म नीट वाचून भरा.
6. फॉर्म भरल्यानंतर 'टॅक्स पेड अँड व्हेरिफिकेशन टॅब' मध्ये उपयुक्त व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडा.
7. यानंतर 'प्रीव्यू अँड सबमिट' वर क्लिक करा.
8. जर तुम्ही 'ई-व्हेरिफिकेशन'चा पर्याय निवडला आहे, तर तुम्ही ईव्हीसी किंवा ओटीपी पैकी कोणत्यही एका मार्गाने ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करू शकता.
9. एकदा व्हेरिफिकेशन पूर्ण झाले की तुम्ही आयटीआर सबमिट करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax, Money