विजय कमळे पाटील, जालनाजालना, 3 ऑगस्ट : सध्या देशभरात ईडी आणि आयकर विभागाचे धाडसत्र सुरू आहे. नुकताच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याघरी ईडीने छापा मारला होता. भल्या सकाळी ईडी घरी आल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली होती. गुन्हेगाराला आपला सुगावा लागू नये यासाठी असे छापे मारले जातात. यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जातात. आज बुधवारी जालना शहरात आयकर विभागाने मारलेला छापाही असाच होता. आयकर विभागाची ही वाहने कोणीही ओळखू शकले नाही. आयकर विभागाच्या या कल्पनेने जालनाकरही अचंबित झाले आहेत.
आलिया गावात अजब वरात..
जालन्यात आयकर विभागाचे धाडसत्र सुरूच आहे. एमआयडीसी येथील काही रोलिंग मिलवर आयकर विभागाने आज छापेमारी केली. यामध्ये जिंदाल मार्केट परिसरातील एक कार्यालय सील करण्यात आले आहे. आयकर अधिकाऱ्यांचे एक पथक स्थानिक पोलिसांच्या फौजफाट्यासह मामा चौकातील सुंदरलाल सावजी को ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेत दाखल झाले आहे. या बँकेतील दस्तावेज झडाझडती सुरू आहे. मात्र, आयकर विभागाचे अधिकारी कार्यालयात छापामारेपर्यंत त्यांना कोणीही ओळखले नाही. कारण, या वाहनांवर वधु-वराच्या विवाहाचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळे महागड्या गाड्या असूनही कोणाच्याही नजरेत ही गोष्ट आली नाही. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामुळे एका प्रकारे आलिया गावात अजब वरात असंच लोक म्हणत असावेत.
Money Mantra: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून या राशीला आजचा दिवस फायद्याचादेशभरात आयकर विभागाची छापेमारी वाढली
काही दिवसांपूर्वी ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या सहकारी असलेल्या एका महिलेच्या घरावर छापा मारला होता. यामध्ये ईडीला अक्षरशः पैसे आणि दागिन्यांचे घबाड मिळाले होते. यात 5 किलोपर्यंत सोन्याचे दागिने आणि 50 कोटींहून अधिक रोख रक्कम मिळाली होती. ईडीनंतर आता आयकर विभागही सतर्क झाला असून देशभरात अनेक ठिकाणी त्यांची छापेमारी सुरू आहे. नुकताच बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये आयकर विभागाच्या (Income Tax) चार पथकांनी शहरातील तीन मोठ्या पानमसाला (Pan Masala) व्यापाऱ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे (Raid) टाकले. आयकर विभागाच्या छाप्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाची चार पथके व्यावसायिकांच्या घरांवर आणि गोदामांवर छापे टाकण्यासाठी बुधवारी सकाळीच पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.