मराठी बातम्या /बातम्या /मनी /

31 डिसेंबरपूर्वी 'हे' काम करा, अन्यथा भरावा लागेल 10000 रुपयांचा दंड

31 डिसेंबरपूर्वी 'हे' काम करा, अन्यथा भरावा लागेल 10000 रुपयांचा दंड

2019-20 (कर वर्ष 2020-21) कर भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. 31 डिसेंबरपर्यंत जर तुम्ही आपला आयटीआर (ITR) भरला नाही, तर तुम्हाला दंड स्वरुपात 10 हजार रुपये ज्यादा भरावे लागतील.

  नवी दिल्ली, 08 डिसेंबर:  कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या (corona pendemic) पार्श्वभूमीवर आयकर विभागाने (Income tax Department) करदात्यांना (Tax Payers) अनेकदा सुट दिली आहे. आयकर विभागाने रिटर्न फाइल (ITR) भरण्याची अंतिम तारीख बऱ्याच वेळा वाढवून दिली आहे. 2019-20 (असेसमेंट इयर 2020-21) कर भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.  31 डिसेंबरपर्यंत जर तुम्ही आपला आयटीआर (ITR) भरला नाही, तर आपल्याला दंड म्हणून 10 हजार रुपये ज्यादा भरावे लागणार आहेत. पण पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना 1 हजार रुपये लेट फी भरावी लागणार आहे. अन्यथा 10 हजार रुपये दंड भरावा लागेल जर तुम्ही वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही, तर आयकर विभागाकडून दंड ठोठावला जातो.  करदात्यांनी जर 31 डिसेंबर नंतर कर भरला तर करदात्याला 10,000 रुपये लेट फी भरावी लागेल. या व्यतिरिक्त ज्या करदात्यांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा लोकांना लेट फी म्हणून केवळ 1000 रुपये द्यावे लागतील. (हे वाचा-SBI ग्राहक असाल तर ही चूक करू नका, नुकसान टाळण्यासाठी जारी केला असा अलर्ट) अशाप्रकारे तुम्ही आयटीआर दाखल करू शकता सर्व करदात्यांना आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. आयटीआर ऑफलाइन, ऑनलाइन किंवा सॉफ्टवेअरच्या मदतीने दाखल करता येऊ शकते. यापैकी सर्व प्रकारचे आयटीआर फॉर्म ऑफलाइन मोडमध्ये भरले जाऊ शकतात. पण आयटीआरमधील केवळ फॉर्म -1 आणि फॉर्म -4 ऑनलाइन पद्धतीने भरता येऊ शकते. जर करदात्यांना हवे असेल तर सॉफ्टवेअरच्या मदतीने सर्व प्रकारचे आयटीआर दाखल करता येतात. शिवाय जावा किंवा एक्सेल स्वरूपात वेबसाइटवर उपलब्ध असलेला आयटीआर फॉर्म डाउनलोड करुन तो ऑफलाइन पद्धतीने भरला जाऊ शकतो. (हे  वाचा-कोट्यवधी कर्जदारांना मिळणार दिलासा? SCच्या सुनावणीवर सगळ्यांचे लक्ष) ऑफलाइन पद्धतीने कर भरायचा असल्यास करदात्यांनी या पद्धतीचा अवलंब करावा करदात्यांना ऑफलाइन पद्धतीने आयटीआर भरायचा असल्यास त्यांनी सर्वप्रथम आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर, इनकम टॅक्स रिटर्न सॉफ्टवेअर वर क्लिक करा आणि मेनूवर जाऊन डाउनलोड वर क्लिक करा. मग आपले असेसमेंट वर्ष निवडून अॅप्लिकेबल आयटीआर डाउनलोड करा. त्यानंतर आयटीआर फॉर्म भरा. करदाता पूर्व-भरलेला एक्सएमएल देखील डाउनलोड करू शकतो.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Income tax

  पुढील बातम्या