Income Tax Return भरणाऱ्यांनो... सावधान! 'या' मेसेजवर क्लिक करू नका

Income Tax Return भरणाऱ्यांनो... सावधान! 'या' मेसेजवर क्लिक करू नका

Income Tax, IT Return - सध्या सगळे जण इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या गडबडीत आहेत. अशा वेळी डिपार्टमेंटनं काही सावधानतेच्या सूचना दिल्यात

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं देशाच्या सर्व करदात्यांना अलर्ट केलंय. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं म्हणणं आहे की लोकांनी कुठल्याही खोट्या रिफंड मेसेजमध्ये फसू नये. कुठल्याही परिस्थितीत आपलं बँक अकाउंट, पिन, ओटीपी, पासवर्ड आणि आर्थिक खातं याची माहिती कोणाबरोबर शेअर करू नये. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट याबद्दल एसएमएस आणि ईमेल द्वारे सर्व रजिस्टर्ड करदात्यांना जागरुक करतेय. गेले अनेक दिवस लोकांना असे फ्राॅड मेसेज येतायत.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कुठलीही माहिती मागत नाही

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं सांगितलं की ते फोन, एसएमएस किंवा ईमेलद्वारे करदात्यांकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्डाची पिन, ओटीपी, पासवर्ड किंवा अशी कुठलीच आर्थिक माहिती मागत नाही.

फ्लिपकार्ड लाँच करतंय क्रेडिट कार्ड, खरेदीवर ग्राहकांना मिळतील 'या' सवलती

कसा ओळखायचा खोटा मेसेज?

फ्राॅड मेसेज कसे ओळखायचे याबद्दल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं काही गोष्टी सांगितल्यात.

ज्या आयडीवरून मेल आलाय, त्याला नीट पाहा. त्यात चुकीचं स्पेलिंग असेल किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटशी मिळतंजुळतं नाव असेल.

'या' तारखेनंतर IT रिटर्न भरला तर 'इतका' पडेल दंड

चुकूनही हे करू नका

अशा कुठल्याच मेलची अटॅचमेंट उघडू नका.

त्या मेलमध्ये दिलेली लिंक चुकूनही क्लिक करू नका.

तुम्ही चुकून कुठली लिंक क्लिक केलीत तर त्यात आपला बँक अकाउंट,  क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड नंबर टाकू नका.

Food Delivery देणाऱ्या Swiggy ने पहिल्यांदाच केली तृतीयपंथीयाची नेमणूक

जुलै महिना हा महत्त्वाचा महिना आहे. कारण या महिन्यात इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं असतं. कारण रिटर्न भरायची शेवटची तारीख सध्या तरी 31 जुलै आहे. हिंदू एकत्र कुटुंब आणि ज्यांच्या खात्यांसाठी ऑडिटिंगची गरज नाही, ज्यांची मिळकत 50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी रिटर्न भरायची शेवटची तारीख 31 जुलै आहे.

तुम्ही 31 जुलैनंतर 31 डिसेंबर 2019पर्यंत IT फाइल केलात तर तुम्हाला 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. तुम्ही 1 जानेवारी 2020पासून 30 मार्च 2020पर्यंत रिटर्न भरलात तर तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागेल.

नदीत अडकला टॅक्टरचालक, पोकलेनच्या मदतीने वाचवण्याचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Income tax
First Published: Jul 12, 2019 05:55 PM IST

ताज्या बातम्या