• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • OMG! चाट विकणारे-पानवाल्यांकडे कोट्यवधींची संपत्ती, भंगार विकणाऱ्यांकडे SUV; धक्कादायक माहिती समोर

OMG! चाट विकणारे-पानवाल्यांकडे कोट्यवधींची संपत्ती, भंगार विकणाऱ्यांकडे SUV; धक्कादायक माहिती समोर

या तपासात असं दिसून आलं, की भंगार विक्री करणारे कित्येक जण हे तीन-तीन एसयूव्ही गाड्यांचे मालक आहेत. तर, कित्येक फळ विक्री करणारे शेकडो गुंठे बागायती जमिनीचे मालक आहेत.

  • Share this:
कानपूर, 20 जुलै: आपल्या नाक्यावरचा चहा टपरीवाला किंवा पाणीपुरीची गाडी असणारा एका दिवसाला किती रुपये कमवत असेल हा प्रश्न प्रत्येकाला एकदा तरी पडलेला असतोच. नोकरी नसलेले, किंवा आहे त्या नोकरीला वैतागलेलेही अशा गाड्यांवर याबाबत चर्चा करताना दिसतात. बऱ्याच वेळा या विक्रेत्यांकडे पाहून असं वाटतं, की यांची दोन वेळेची खाण्याची भ्रांत असेल. पण कानपूरमधील असे 256 ‘ठेलेवाले’ चक्क कोट्यधीश असल्याचं एका तपासात समोर आले आहे (millionaire street vendors). बिग डेटा सॉफ्टवेअर (Big Data Software), प्राप्तीकर विभाग (Income Tax) आणि जीएसटी रजिस्ट्रेशनने (GST Registration) संयुक्तपणे केलेल्या या तपासामध्ये अशा 256 जणांची नावं पुढे आली आहेत, जे छोटे मोठे गाडे आणि टपऱ्या चालवतात. पण, खरंतर त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. यामध्ये पान टपरी, चाट-समोशाची गाडी चालवणारे आणि लहान-लहान किराणा दुकान चालवणाऱ्यांचाही समावेश आहे. या तपासात असं दिसून आलं, की भंगार विक्री करणारे कित्येक जण हे तीन-तीन एसयूव्ही गाड्यांचे मालक आहेत. तर, कित्येक फळ विक्री करणारे शेकडो गुंठे बागायती जमिनीचे मालक आहेत. हे सगळं असलं, तरी यांपैकी कोणीही प्राप्तीकर भरत नाही हे विशेष. TV9 भारतवर्षने याबाबत वृत्त दिलं आहे. हे वाचा-Petrol-Diesel Price: लवकरच स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल? आज दर रेकॉर्ड स्तरावर या तपासात (Income Tax and GST investigation) असं समोर आलं, की जीएसटीमध्ये नोंद नसलेल्या व्यापाऱ्यांनी गेल्या चार वर्षांमध्ये तब्बल 375 कोटी रुपयांची संपत्ती खरेदी केली आहे. कित्येक फेरीवाल्यांकडे शेकडो एकर जमीन आहे. कानपूर ग्रामीण भागापासून ते अगदी फर्रुखाबादपर्यंत जमीनी घेतल्या गेल्या आहेत. आर्यनगर, स्वरुप नगर आणि बिरहानामधील काही पानवाल्यांनी कोरोना काळात पाच कोटींची संपत्ती खरेदी केल्याचं समोर आलं आहे. तर, मालरोडवरील एक खस्ता कचोरीवाला दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या दुकानांसाठी दरमहा प्रत्येकी सव्वा लाख रुपये भाडं देत असल्याचं दिसून आलं आहे. लाल बंगला आणि बेकनगंज परिसरातील दोन भंगारवाल्यांनी दोन वर्षांत दहा कोटींची संपत्ती खरेदी केल्याचं या तपासात समजलं आहे. हे वाचा-नोकरदारांसाठी खूशखबर! 1ऑक्टोबरपासून बेसिक सॅलरी 15000 वरुन 21000 होण्याची शक्यता प्राप्तीकर विभाग आणि जीएसटी विभाग अशा लोकांचा शोध घेत आहे, जे कोट्यवधी रुपये कमवत असूनही कर भरत नाहीत. कर भरणाऱ्या लोकांसोबतच आता प्राप्तीकर विभाग गल्लोगल्ली फिरुन फेरीवाले आणि लहान दुकानदार यांची तपासणी करत आहे. कित्येक चाट विक्रेते, किराणा दुकानदार आणि मेडिकल दुकानदार असे आहेत, जे कोट्यावधी कमावतात, मात्र कर भरत नाहीत. ज्या व्यापाऱ्यांनी जीएसटी नोंदणी केली नाही, अशा लोकांना पकडण्यासाठी बिग डेटा सॉफ्टवेअरचं नवीन टेक्निक वापरण्यात येत आहे.
First published: