मुंबई, 16 मे : अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज ( 16 मे ) सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झालीय. दिल्ली सराफा बाजारात सोन्यात 70 रुपयांनी वाढ होऊन सोनं 33,330 रुपये प्रति ग्रॅम झालंय. चांदीही 50 रुपयांनी वधारलीय. चांदी 38,250 रुपये झालीय. सोन्याच्या दरात एकाच आठवड्यात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.
अमेरिकन कंपनी भारतात उघडणार 600 रेस्टाॅरंट्स, 'इतक्या' नोकऱ्या होणार उपलब्ध
अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या किमती कमी झाल्या होत्या. आॅल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीप्रमाणे सोन्याची किंमत 50 रुपयांनी कमी होऊन 32,670 रुपये प्रति ग्रॅम झाल्या होत्या. तर चांदी 10 रुपयांनी कमी होऊन 38,120 रुपये प्रति किलोग्रॅम झाली होती.
आयटी क्षेत्राचे वाईट दिवस संपले, 'या' 4 मोठ्या कंपन्यांमध्ये आहेत व्हेकन्सीज्
दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 50-50 रुपयांनी कमी झालं होतं. ते 32,670 रुपये आणि 32,500 रुपये प्रति 10 ग्रॅम मिळत होतं.
पण अक्षय तृतीयेनंतर त्यात वाढ सुरू झाली. अगोदर व्यापाऱ्यांनी सांगितलं की, घरगुती पातळीवर सोन्याची मागणी कमी झाली म्हणून किमती कोसळल्या होत्या. त्याचबरोबर अमेरिकन अर्थव्यवस्थेत आलेल्या मजबुतीमुळे गुंतवणूकदार सोन्याऐवजी शेअर बाजारात गुंतवणूक करतात. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव कमी झाले होते.
घर विकून सुरू केला होता 'हा' व्यवसाय, आता कमवतायत महिन्याला 1 कोटी रुपये
येत्या काही दिवसात वेगळं चित्र पाहायला मिळालं. अमेरिका-चीन यांच्या ट्रेड युद्धामुळे शेअर मार्केट कोसळलं. त्यामुळे अनेक जणांनी पुन्हा सोन्यात गुंतवणूक करणं सुरू केलं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वधारला.
VIDEO : गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या साध्वींना भाजपने फटकारलं, दिला 'हा' आदेश