दर महिन्याला मिळवा 60 हजार रुपये पेन्शन, मोदी सरकारच्या योजनेचा घ्या फायदा

तुम्ही तरुण असाल, तर गुंतवणुकीच्या खूप योजना आहेत. अशाच एका योजनेबद्दल जाणून घ्या

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 12:26 PM IST

दर महिन्याला मिळवा 60 हजार रुपये पेन्शन, मोदी सरकारच्या योजनेचा घ्या फायदा

मुंबई, 07 जून : तुम्ही तरुण असाल, तर गुंतवणुकीच्या खूप योजना आहेत. भविष्यकाळासाठी तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत ठेवू शकता. सरकारची नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. शिवाय दर महिन्याला तुम्हाला प्रचंड गुंतवणूक करायची गरज नाही. तुम्ही दर महिन्याला 5 हजार रुपये गुंतवून निवृत्तीनंतर महिन्याला 60 हजार रुपये पेन्शन मिळवू शकता. सोबत तुम्हाला 23 लाख रुपयांची एक रकमी रक्कम मिळेल.

कोण घेऊ शकतो NPSचा फायदा?

नॅशनल पेन्शन सिस्टम ( NPS ) मध्ये 18 ते 60 वर्षाच्या वयोगटातला पगारदार येऊ शकतो. अगोदर ही योजना फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती. आता 2009पासून खासगी नोकरी करणारेही ही योजना घेऊ शकतात.

SPECIAL REPORT: इथे मिळत आहे फक्त 10 रुपयांत साडी

कोण घेतं ही गुंतवणुकीची जबाबदारी?

Loading...

नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS)मध्ये जमा केलेल्या पैशाची गुंतवणूक करण्याची जबाबदारी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथाॅरिटी ( PFRDA )द्वारा रजिस्टर्ड पेन्शन मॅनेजर्सना दिली जाके. हा फंड मॅनेजर तुम्हाला इक्विटी, सरकारी सुरक्षा आणि गैर सरकारी सुरक्षा याव्यतिरिक्त फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक करतो. तुम्ही त्यापैकी निवड करू  शकता.

SPECIAL REPORT: पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा; चहूबाजूंनी पाकिस्तानची कोंडी

कशी मिळणार 60 हजार रुपये दर महिन्याला पेन्शन?

तुम्ही 25 वर्षाचे असताना ही योजना स्वीकारली तर 60 वर्षापर्यंत दर महिन्याला 5 हजार रुपये या योजनेत गुंतवायला हवेत. तुम्ही केलेली गुंतवणूक 21 लाख रुपये असेल. NPSमध्ये गुंतवणुकीवरचे रिटर्न 8 टक्के धरले तर एकूण पैसे 1.15 कोटी रुपये होतील. यातल्या 80 टक्के रकमेतून एन्युटी खरेदी केली, तर व्हॅल्यू जवळजवळ 93 लाख रुपये होईल. एन्युटी रेट 8 टक्के असेल तर 60व्या वर्षी तुम्हाला दर महिन्याला 61 हजार रुपये पेन्शन मिळेल. सोबत 23 लाख रुपये फंडही.

Union Budget 2019 : अर्थसंकल्पाबद्दल माहिती असायलाच हव्यात अशा 10 गोष्टी

कसं उघडाल खातं?

तुम्ही कुठल्याही बँकेत जाऊन खातं उघडू शकता. यासाठी बर्थ सर्टिफिकेट, 10वीची पदवी, पत्ता यांचं प्रूफ, आयकार्ड आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन फाॅर्म बँकेत मिळतील.

2 प्रकारची खाती

यासाठी टियर 1 अकाउंट उघडावं लागतं. नंतर तुम्ही टियर 2 अकाउंट उघडू शकता. टियर 1मध्ये 60 वर्षांपर्यंत जमा झालेले पैसे तुम्ही काढू शकत नाही. पण टियर 2 मधून तुम्ही फंड कधीही काढू शकता.


VIDEO: सोलापुरात बस जळून खाक, 8 जण गंभीर जखमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...