मराठी बातम्या /बातम्या /मनी /

'या' क्षेत्रात भारत चीनला टाकणार मागे, मारुती सुझकीचे चेअरमन आरसी भार्गव यांनी व्यक्त केला विश्वास

'या' क्षेत्रात भारत चीनला टाकणार मागे, मारुती सुझकीचे चेअरमन आरसी भार्गव यांनी व्यक्त केला विश्वास

सरकार आणि उद्योजकांनी एकत्र येत काम केल्यास भारत या महत्त्वाच्या क्षेत्रात चीनलाही मागे टाकेल, असा विश्वास मारुती सुझुकी इंडियाचे चेअरमन आर. सी. भार्गव (Maruti Suzuki Chairman RC Bhargava) यांनी व्यक्त केला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर: सरकार आणि उद्योजकांनी एकत्र येत काम केल्यास भारत लो कॉस्ट मॅन्युफॅक्चरींमध्ये चीनला मागे टाकू शकेल असा विश्वास मारुती सुझुकी इंडियाचे चेअरमन आर. सी. भार्गव (Maruti Suzuki Chairman RC Bhargava) यांनी व्यक्त केला आहे. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या एका ऑनलाइन कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी भारतीय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याविषयी आपले मत व्यक्त केले.

यावेळी ते म्हणाले, सरकार आणि उदयोजकांनी एकत्र येत काम केले तर चीनपेक्षा कमी किमतीत मॅन्युफॅक्चरिंग करण्याची क्षमता भारताकडे आहे. भारतीय कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढवणं हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट असायला हवं असल्याचे मतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यामुळे कमी किमतीमध्ये जास्तीतजास्त उत्तम उत्पादन ग्राहकांना मिळू शकते.

(हे वाचा-नोकरदारांसाठी बेस्ट आहेत या 4 LIC पॉलिसी, जीवन विम्याबरोबर मिळतील लाखो रुपये)

सर्व क्षेत्रांत रोजगार वाढणं महत्त्वाचं

उदयोगांमध्ये जितकी जास्त विक्री होईल तितक्याच वेगाने अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होऊन रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये वाढ करण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये रोजगार वाढवणं महत्त्वाचं असल्याचं भार्गव यांनी यावेळी नमुद केलं.

स्थानिक नागरिकांसाठी रोजगार आरक्षित करणे गैर-प्रतिस्पर्धी

या कार्यक्रमात कारखान्यांमध्ये स्थानिक नागरिकांना रोजगारसाठी प्राधान्य आणि आरक्षण देण्याच्या राज्य सरकारांच्या निर्णयावर त्यांनी टीका केली आहे. त्यांनी याला चुकीची स्पर्धा म्हटलं आहे. देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनादेखील जागतिक स्तरावर जितकी मोठी कंपनी आहे तितकाच मोठा प्रतिस्पर्धी आवश्यक आहे.

(हे वाचा-आजपासून बंद होणार 94 वर्ष जुनी बँक, ग्राहक आणि गुंतवणुकदारांसाठी होणार असे बदल)

कंपनीतील कर्मचाऱ्यांना आणि श्रमिकांना जोपर्यंत प्रशासन योग्य सन्मान देत नाहीत तोपर्यंत उद्योग स्पर्धात्मक बनणार नाही. यामध्ये त्यांनी त्यांच्या मारुती सुझुकी कंपनीचे उदाहरण दिले. त्यांनी असे म्हटले की, कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्याला समजावले आहे की, कंपनीने प्रगती झाली तर कामगारांची देखील प्रगती होणार आहे.

First published:

Tags: Money