5 दिवसात 1500 रुपयांनी वाढली सोन्याची किंमत, जाणून घ्या कधी कमी होणार दर

5 दिवसात 1500 रुपयांनी वाढली सोन्याची किंमत, जाणून घ्या कधी कमी होणार दर

या आठवड्यात प्रति तोळा सोन्याचे भाव 1500 रुपयांनी वधारले आहेत. सुरक्षिततेमुळे सोन्यामधील गुंतवणूक देखील वाढली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज वाढ होत आहे. शुक्रवारी MCX मध्ये सोन्याचे भाव 42 हजार 509 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या आठवड्यात प्रति तोळा सोन्याचे भाव 1500 रुपयांनी वधारले आहेत. MCX मध्ये चांदीचे दरही एका टक्क्याने वाढले असून प्रति किलो चांदीचे भाव 48 हजार 418 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. शुक्रवारी सुट्टी असल्यामुळे ट्रेडिंग बंद होतं मात्र संध्याकाळी ट्रेडिंगसाठी MCX खुलं ठेवण्यात आलं होतं.

तज्ज्ञांच्या माहितीनूसार कोरोना व्हायरसचा परिणाम आता दिसू लागला आहे. एका मोठ्या रिसर्च फर्मच्या अहवालानुसार कोलमडलेल्या जागतिक बाजारामुळे गुंतवणूकदार सेफ इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात करत आहेत. दरम्यान पुढील एका महिन्याकरता तरी सोन्याच्या किंमती कमी होण्याची शक्यता कमी आहे.

7 वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारातील सर्वात मोठा भाव

कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रील बाजारातील (Global Market) उलाढालींवर नकारात्मक परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या गुंतवणुकीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. जानेवारीनंतर कोरोना व्हायरसचा जोर काहीसा ओसरला असला तरीही अजूनही ही समस्या भीषणच आहे. दक्षिण कोरियामध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. एकंदरित कोरोनाचा जागतिक बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत 2.5 टक्क्यांनी वाढ होऊन दर 1 हजार 625.05 प्रति औंस आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत 0.40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गोल्ड ETF मध्ये वाढ

सोन्यामध्ये इनव्हेस्टमेंट डिमांड (Gold Investment Demand) वाढली आहे. जगातील सगळ्यात मोठ्या गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) म्हणजेच SPDR गोल्ड ट्रस्टमध्ये देखील सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामध्ये गुरूवारी 0.25 टक्क्यांनी वाढ झाली असून आता 933.94 टनपर्यंत पोहोचली आहे. 3 वर्षातील सर्वात उच्च असा हा दर आहे. चांदीच्या किंमतीमध्ये देखील 0.5 तर प्लॅटिनममध्ये 0.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

First published: February 22, 2020, 4:26 PM IST

ताज्या बातम्या