Home /News /money /

सोन्यावर मिळतोय गेल्या 5 महिन्यांमधील सर्वाधिक डिस्काऊंट, तुम्हालाही आहे संधी

सोन्यावर मिळतोय गेल्या 5 महिन्यांमधील सर्वाधिक डिस्काऊंट, तुम्हालाही आहे संधी

गेल्या 4 ते 5 महिन्यांमध्ये सोन्याची खरेदी झाली नव्हती, त्यात आता सवलत मिळत असल्याने सोने खरेदी वाढण्याची शक्यता आहे

    नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे गोल्ड डीलर्स (Gold Dealers) यांना सोन्याच्या किंमतीवर मोठी सवलत द्यावी लागत आहे. भारतात सोन्यावरील डिस्काउंट (Discount on Gold) तब्बल 43 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचली आहे. ही सवलत गेल्या 5 महिन्यात सोन्यावर मिळणारी सर्वात जास्त आहे. न्यूज एजंसी रॉयटर्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. केवळ गेल्या आठवड्यातच गोल्ड डिलर्सने सोन्याच्या किंमतीवर 20 डॉलरपर्यंत सवलत दिली होती. मागणी कमी होण्याव्यतिरिक्त जुना स्टॉक कमी व्हावा यासाठीही सवलत दिली जात आहे. भारतात सोन्यावर 12.5 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसटी द्यावा लागतो. देशांतर्गत बाजारात शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीच्या आधारे सोने-चांदीच्या किंमतीमध्ये (Gold-Silver Rates) तेजी पाहायला मिळाली. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑक्टोबरच्या सोन्याचा वायदा भाव 1 टक्क्याने वाढून 51,399 रुपये प्रति तोळा झाली होती. तर चांदीच्या किंमतीमध्ये 1.5 टक्के वाढ झाली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी भारतामध्ये सोन्याच्या किंमतीत चढउतार पाहायला मिळाला. तरी देखील 7 ऑगस्ट रोजी 56000 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्यानंतर आता सोन्याची किंमत जवळपास 5000 रुपयांनी कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 2 टक्क्यांनी वाढले. डॉलरचे उतरलेले मुल्य आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (US Federal Reserve) द्वारे आणखी कमी व्याजदर होण्याबाबतचे संकेत मिळाल्यामुळे सोने मजबुत झाले आहे. अमेरिकेत सोन्याचा वायदे भाव 2 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे सोन्याचे दर 1,974 डॉलर प्रति औंस होते. गुरुवारी अमेरिकेच्या केंद्रीय बँकेचे चेअरमन जेरोम पावेल (Fed Chairman Jerome Powell) द्वारे नवीन रणनीतीबाबत देण्यात आलेल्या भाषणानंतर सोन्याचे भाव 2 टक्क्यांनी घसरले होते.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Gold

    पुढील बातम्या